रविवारी ‘डंकी’ आणि ‘सालार’मध्ये ‘काँटे की टक्कर’! शाहरुखच्या सिनेमाने ओलांडला ४०० कोटींचा टप्पा

मुंबई– शाहरुख खानच्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘डंकी’ चित्रपटाच्या कमाईत १८व्या दिवशी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाने एकूण १८ दिवसांत २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. तर प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील आकडेही दुप्पट आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट दक्षिणेतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.

शाहरुखच्या डंकीचा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहून काय म्हणाले प्रेक्षक?

sacnilk च्या अहवालानुसार, शनिवारी शाहरुख खानच्या ‘डंकी’च्या कमाईत ६०% वाढ झाली आणि ३.६ कोटी रुपयांची कमाई झाली, तर रविवारी कलेक्शन आणखी वाढले. या चित्रपटाने १८ व्या दिवशी ४.२५ कोटींची कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने आतापर्यंत एकूण २१६.५७ कोटींची कमाई केली आहे.

रस्त्यावर थुकता, हॉर्न वाजवता तेव्हा… बायका वाईटच गाडी चालवतात यावर श्रुती मराठेने सुनावले खडे बोल
शाहरुख खानच्या ‘डंकी’चे जगभरातील कलेक्शन

या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, १८ दिवसांत ४२४ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने १७ दिवसांत एकूण ४१९.७५ कोटींची कमाई केली आहे. २०२३ मधील शाहरुखचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याने ४०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

मराठीतही ‘स्टार’ व्हायला हवेत, त्यांच्या नावावर प्रेक्षक यायला पाहिजेत… असं का म्हणाले नागराज मंजुळे
प्रभासच्या ‘सालार’ने १७ दिवसात किती कमाई केली?

प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, ‘डंकी’च्या अवघ्या एक दिवसानंतर प्रदर्शित झालेला हा चित्रपट कमाईच्या शर्यतीत खूप पुढे गेला आहे. Sacnilk च्या मते, चित्रपटाने शनिवारी ५.४५ कोटी रुपये कमावले होते, तर रविवारी कलेक्शन सुमारे ५.७५ कोटी रुपये होते. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत एकूण ३९२.९४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Source link

dunki box office collectionprabhas moviesalaar box office collectionshah rukh khan movieडंकी बॉक्स ऑफिस कलेक्शनप्रभास सिनेमाशाहरुख खान सिनेमासालार बॉक्स ऑफिस कलेक्शन
Comments (0)
Add Comment