राष्ट्रीय संरक्षण अकादमी ही भारतीय सशस्त्र दलातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी प्रमुख संस्था आहे. भारतीय नौदल अकादमी पात्र उमेदवारांना नौदलात व्यावसायिक अधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण देते. संघ लोकसेवा आयोग या परीक्षांचे आयोजन करेल.
अर्जासाठी पात्रता निकष :
१२ वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या परीक्षांसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. या पदांसाठी केवळ अविवाहित उमेदवारच अर्ज करू शकतात. अर्जदार निरोगी असले पाहिजेत आणि त्यांनी सर्व शारीरिक आणि वैद्यकीय नियमांचे पालन करणे आवशयक आहे.
वयोमर्यादा :
नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी आणि इंडियन नेव्हल अकादमीमध्ये भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेला बसणाऱ्या अर्जदारांचा जन्म २ जुलै २००५ पूर्वी आणि १ जुलै २००८ नंतर झालेला नसावा.
रिक्त पदांची संख्या :
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि भारतीय नौदल अकादमीमधील अधिकारी पदांशी संबंधित एकूण ४०० रिक्त जागा UPSC NDA परीक्षेद्वारे भरल्या जातील.
1. आर्मी- २०८ रिक्त जागा (महिलांसाठी १० जागा राखीव)
2. नौदल- ४२ रिक्त जागा (१२ जागा महिलांसाठी राखीव)
3. हवाई दल- फ्लाइंग ९२ पदे (२ जागा महिलांसाठी राखीव)
4. ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) – १८ पदे (२ जागा महिलांसाठी राखीव)
5. ग्राउंड ड्युटी (गैर-तांत्रिक) – १० पदे (२ जागा महिलांसाठी राखीव)
नेव्हल अकादमी – नेव्हल अकादमी कॅडेट प्रवेश योजनेतील ३० पैकी ९ जागा महिलांसाठी राखीव आहेत.
अर्ज फी :
या परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून १०० रुपये भरावे लागतील.
महत्त्वाच्या तारखा :
UPSC NDA परीक्षा २०२४ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी आहे.
UPSC NDA परीक्षा २०२४, २१ एप्रिल २०२४ रोजी घेतली जाईल.
नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये प्रशिक्षणासाठी परीक्षा केंद्र :
- खडकवासला, पुणे येथे आणि प्रशिक्षणासाठी नेव्हल अकादमी एझिमाला, कन्नूर येथे असेल.
- शिवाय, तिरुवनंतपुरम, कोची, कोझिकोड, कोईम्बतूर, बेंगळुरू, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली येथेही परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
- उमेदवारांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर, त्यांना त्यांच्या पसंतीचे केंद्र वाटप केले जाईल.