Lava Blaze Curve 5G टीज
Lava Blaze Curve 5G लावा चा आगामी स्मार्टफोन असेल. लावा मोबाइल्सचे प्रेसिडेंट सुनील रैना यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून फोनचे नाव शेयर केले आहे. परंतु त्यांची पद्धत थोडी गोंधळात टाकणारी आहे. पोस्टमध्ये त्यांनी एक कोड डी-कोड करण्यास सांगितला आहे. नीट जुळवाजुळव केली तर ह्या कोड मधून Blaze Curve 5G बनतो. म्हणजे कंपनी ह्यात कर्व्ड डिस्प्ले वर जास्त लक्ष देणार आहे. त्यामुळे फोनमध्ये OLED डिस्प्ले मिळू शकतो. ह्या व्यतिरिक्त फोन बाबत इतर कोणतीही माहिती मिळाली नाही.
Lava Agni 2 5G मध्ये देखील कर्व्ड डिस्प्ले
काही दिवसांपूर्वी आलेल्या Lava Agni 2 5G मध्ये देखील कंपनीनं कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. स्पेसिफिकेशन्स पाहता फोनमध्ये ६.७८ इंचाचा फुल-एचडी+ (२२२०x१०८० पिक्सल) डिस्प्ले आहे. ह्यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. फोनमध्ये मीडियाटेकचा डायमेंसिटी ७०५० प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्टॉक अँड्रॉइड १३ वर चालतो म्हणजे शुद्ध अँड्रॉइड एक्सपीरियंस मिळतो. कंपनीनं Android 14 आणि Android 15 अपग्रेड देणार असल्याचे देखील सांगितले होते.
कॅमेरा पाहता ह्यात ५० मेगापिक्सलचा मेन सेन्सर आहे. त्याचबरोबर ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा आहे. फोन मधील ८जीबी रॅम व्हर्च्युअली १६ जीबी पर्यंत वाढविता येतो. Lava Agni 2 5G मध्ये ४,७०० एमएएचची बॅटरी आहे, जी ६६ वॉट वायर्ड फास्ट-चार्जिंगला सपोर्ट करते. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील ह्या फोनमध्ये देण्यात आला आहे.