प्रकाश शेंडगेंनी जरांगेंना ललकारलं; आझाद मैदानावरुन मराठा Vs ओबीसी वाद तापण्याची शक्यता

नांदेड: गेल्या काही दिवसांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आणि ओबीसी समाजात निर्माण झालेली तेढ कायमच आहे. मनोज जरांगे पाटील ओबीसी समजातून आरक्षणाची मागणी करीत आहेत, तर ओबीसी समाजाकडून याचा विरोध केला जात आहे. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. येत्या २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे हे लाखो मराठा बांधवासह मुंबईकडे रवाना होणार आहेत, तर दुसरीकडे ओबीसी समाजाने देखील २० जानेवारीपासून आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनासाठी मराठा समाजाकडे १० लाख गाड्या असतील तर आमच्याकडे पण २ हजार गाढवं, मेंढरं तयार आहेत, आम्ही पण आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले. रविवारी नांदेड जिल्ह्यातील नायगाव नरसी येथे ओबीसी समाजाचा ओबीसी आरक्षण बचाव मेळावा पार पडला, यावेळी ते बोलत होते.

गोदापट्ट्यातील १२३ गावांवर भिस्त, मनोज जरांगेंनी ताकद लावली, गावकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन

मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी खासदार विकास महात्मे, प्रा. टी.पी.मुंडे, सचिन नाईक, अविनाश भोसीकर, महेंद्र देमंगुंडे यांच्यासह ओबीसी ओबीसी समाजाचे नेते उपस्थित होते. मनोज जरांगे यांच्या आंदोलना वरून प्रकाश शेंडगे यांनी जोरदार टीका केली. ३ कोटी मराठा, १० लाख गाड्या, १ हजार कोटी डिझेल खर्च करून गरीब मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईला आंदोलन करणार आहे. गरीब मराठ्यांच आंदोलन हे आरक्षणासाठी नसून ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आणण्यासाठीच आंदोलन असल्याची टीका शेंडगे यांनी केली. तुम्ही आमच आरक्षण धोक्यात आणण्यासाठी आंदोलन करणार आहात तर, आम्ही पण आरक्षण वाचवण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावरच आंदोलन करणार आहोत. तुमच्याकडे १० लाख गाड्या असतील, पण आमच्याकडे पण हजारो गाढवं, डुकरं, मेंढऱ्या असून त्यांना घेऊन आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचे प्रकाश शेंडगे म्हणाले. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा दिले आहे, ते पण आंदोलनात सहभाग घेणार असल्याचे देखील ते म्हणाले.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्यास ते एक दिवसही टिकणार नाही : छगन भुजबळ

आझाद मैदानावरून मराठा – ओबीसी समाजात संघर्षाची शक्यता

आरक्षणासाठी शासनाला दोन वेळा अल्टीमेटम दिल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार आहे. याच मैदानावर ओबीसी समाज देखील २० जानेवारी पासून आंदोलन केलं जाणार आहे. आम्ही सर्वात पहले मैदानाची मागणी केली आहे. ३ कोटी मराठा आंदोलकासाठी हे मैदान कमी पडणार आहे, तेव्हा शासनाने त्यांना दुसरं मैदान द्यावे, त्यांना आझाद मैदान कमी पडणार असल्याचे प्रकाश शेंडगे म्हणाले. दरम्यान येत्या काही दिवसात आझाद मैदानावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवायचा नाही; अजित पवारांचा जरांगेंना इशारा

Source link

Maharashtra politicsmanoj jarange patilMaratha Reservationnanded newsOBC reservationprakash shendgeप्रकाश शेंडगेमनोज जरांगे पाटील
Comments (0)
Add Comment