नुकतीच आरोग्य संचालनालयाने याबाबत अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. ही मुलाखत प्रक्रिया १० जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तेव्हा या भरतीमधील सर्व तपशील जाणून घेऊया.
‘जिल्हा रुग्णालय, मडगाव – गोवा भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
स्टाफ नर्स (परिचारिका) – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार नर्सिंग कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याद्वारे मान्यताप्राप्त संस्थेची बॅचलर पदवी उत्तीर्ण असावा. एएनएम (प्राधान्याने जीएनएम/बी. एस्सी नर्सिंग) आणि किमान २ वर्षे रुग्णालयामध्ये काम केल्याचा अनुभव असावा.
वेतन – २० हजार (मासिक)
नोकरी ठिकाण – गोवा
वयोमर्यादा – कमाल ४० वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता – एम एस केबिन, २ रा मजला, प्रशासकीय विभाग, हॉस्पिसिओ एसजीडीएच, मडगाव
मुलाखतीची तारीख – १० जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘आरोग्य संचालनालय, गोवा’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया – या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. मुलाखतीला येण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच मुलाखतीला येताना जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखत प्रक्रिया १० जानेवारी रोजी दुपारी १.०० वाजता सुरू होईल.