‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स’ मध्ये मोठी भरती; हे उमेदवार करू शकतात अर्ज

United India Insurance Co Ltd Recruitment 2024: युनायटेड इंडिया इन्शुरन्स’ यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे प्रशासकीय अधिकारी (स्केल I) पदाच्या एकूण २५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत कंपनीने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून २३ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
प्रशासकीय अधिकारी (स्केल I) – २५० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २५० जागा

शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून ६० टक्के गुणांसह पदवीधर असावा आणि त्याला संगणकाचे उत्तम ज्ञान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना ५५ टक्के गुणांची सवलत आहे. विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वयोमर्यादा – किमान २१ ते ३० वर्षे

अर्ज पद्धती –
ऑनलाइन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – ०८ जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जानेवारी २०२४

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २३ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

recruitmentUIIC Bharti 2024UIIC Recruitment 2024United India Insurance Co Ltd RecruitmentUnited India Insurance Co Ltd Recruitment 2024युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी भरती २०२३
Comments (0)
Add Comment