फक्त १४ हजारांत आला Vivo चा नवीन 5G Phone, वॉटर प्रूफ रेटिंगसह 16GB RAM ही

विवोनं आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Vivo Y28 5G लाँच केला आहे. हा मोबाइल एक लो बजेट ५जी फोन आहे ज्याची किंमत फक्त १३,९९९ रुपयांपासून सुरु होते. फोनमध्ये ५०एमपी कॅमेरा, ८जीबी एक्सटेंडेड रॅम, मीडियाटेक डायमेन्सिटी ६०२० चिपसेट आणि ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. चला जाणून घेउयाय विवो वाय२८ ५जी ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

Vivo Y28 5G ची किंमत

हा विवो फोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. ह्याच्या बेस व्हेरिएंटमध्ये ४जीबी रॅम + १२८जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत १३,९९९ रुपये आहे. तसेच ६जीबी रॅम + १२८जीबी स्टोरेजची किंमत १५,४९९ रुपये तर सर्वात मोठा व्हेरिएंट ८जीबी रॅम + १२८जीबी स्टोरेजची किंमत १६,९९९ रुपये आहे. फोन अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसह ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून देखील विकत घेता येईल. विशेष म्हणजे SBI, DBS आणि IDFC First बँक युजर्सना १५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळेल.

Vivo Y28 5G चे स्पेसिफिकेशन्स

विवो वाय२८ ५जी फोन १६१२ × ७२० पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.५६ इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही एलसीडी स्क्रीन आहे जी ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते तसेच ८४०निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते.

हा मोबाइल अँड्रॉइड १३ वर लाँच झाला आहे जो फनटच ओएस १३ सह चालतो. प्रोसेसिंगसाठी ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी ६०२० ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. हा फोन ८जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह आला आहे. ही वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी फोनच्या ८जीबी फिजिकल रॅमसह मिळून १६जीबी पर्यंत वाढवते.

फोटोग्राफीसाठी विवो वाय२८ ५जी फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे, सोबत २ मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हा विवो ५जी फोन ७ 5G Bands ना सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी ह्यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर तसेच फेस अनलॉक फीचर मिळतं. वाय२८ ५जी फोन आयपी५४ रेटेड आहे ज्यामुळे पाणी आणि धुळीपासून हा काही प्रमाणात वाचू शकतो. पावर बॅकअपसाठी Vivo Y28 5G मध्ये ५,०००एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा मोबाइल १५वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

Source link

vivo y28 5gvivo y28 5g launched in indiaविवो फोनविवो वाय२८ ५जीस्वस्त ५जी फोन
Comments (0)
Add Comment