या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. ही मुलाखत प्रक्रिया १० जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रत, वेतन आणि मुलाखत प्रक्रिया याचे सविस्तर तपशील जाणून घेऊया.
‘टाटा मेमोरियल सेंटर/ हॉस्पिटल मुंबई भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच त्याने दोन वर्षांचं आयटीआय (इलेक्ट्रिशन) हा कोर्स केलेला असावा. तसेच संबधित कामाचा त्याला तीन वर्षांचा अनुभव असावा.
वेतन –
२१ हजार ७०० ते २५ हजार (मासिक)
नोकरी ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे
मुलाखतीचा पत्ता – एच.आर.डी. विभाग, आउटसोर्सिंग सेल, चौथा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परेल, मुंबई – ४००१२.
मुलाखतीची तारीख – १० जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘टाटा मेमोरियर हॉस्पिटल.’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया: या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. मुलाखतीला येण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच मुलाखतीला येताना जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखत प्रक्रिया १० जानेवारी रोजी सकाळी ९,३० वाजता सुरू होईल.