Nitin Gadkari: गडकरींवरील ‘तो’ आरोप तथ्यहीन; उच्च न्यायालयापुढे युक्तिवाद

हायलाइट्स:

  • नितीन गडकरी यांच्यावरील आरोप तथ्यहीन.
  • दोन्ही निवडणूक याचिका रद्द केल्या जाव्यात.
  • नागपूर खंडपीठापुढे वकिलांनी केला युक्तिवाद.

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या निवडणूक याचिकांमधील आरोप तथ्यहीन आहेत असा दावा करतानाच त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दोन्ही निवडणूक याचिका रद्द करण्यात याव्यात, असा युक्तिवाद गडकरींच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे करण्यात आला. ( Nitin Gadkari Election Petition Update )

वाचा: ओबीसी आरक्षण: …तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यावर सर्वपक्षीय सहमती

याचिकाकर्ता नाना पटोले आणि नफीस खान यांनी स्वतंत्र याचिका दाखल करीत गडकरींच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. गडकरींनी लोकसभा २०१९ साठी दाखल केले शपथपत्र खोटे असल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. यात त्यांनी दाखवलेली संपत्ती, मिळकतीबाबची माहिती खोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्याकडून यावर आज बाजू मांडण्यात आली. वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांनी गडकरींच्या वतीने बाजू मांडली. गडकरींवर करण्यात आलेले आरोप तथ्यहीन असल्याचा दावा त्यांनी केला आणि या याचिका रद्द करण्याची मागणी केली. यावर या प्रकरणी पुढील सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडावी असे आदेश न्यायालयाने दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. सतीश उके यांनी बाजू मांडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

वाचा: हे काम माझे हितचिंतकच करताहेत!; वाढदिवशी खडसेंची फटकेबाजी

नेमकं काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नफीस खान यांनी नितीन गडकरी यांच्या निवडीला याचिकेद्वारे हायकोर्टात आव्हान दिले आहे. नितीन गडकरी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र भरताना त्यात आपल्या उत्पन्नाविषयी खोटी माहिती दिली. तसेच त्यांचे नाव नितीन जयराम गडकरी की नितीन जयराम बापू गडकरी असे आहे, हे सुद्धा स्पष्ट नाही. निवडणुकीत अनेक मतदान केंद्रांवर अतिरिक्त मतदान झाले असतानाही केंद्रप्रमुखांनी मतदान प्रक्रिया सुरूच ठेवली होती. मतदारांच्या नोंदणीतही मोठा घोळ होता. या सर्व बाबी विचारात घेता नितीन गडकरी यांनी चुकीच्या माहितीद्वारे मतदारांची फसवणूक केली असून त्यांची निवड अवैध ठरवण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे.

वाचा: कल्पिता पिंपळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली ही एकमेव विनंती!

Source link

election petition against nitin gadkarinitin gadkari election petitionnitin gadkari election petition updatenitin gadkari high court latest newsnitin gadkari high court updateनाना पटोलेनितीन गडकरीनिवडणूक याचिकालोकसभा २०१९सुनील मनोहर
Comments (0)
Add Comment