क्लॅट २०२४ च्या जागा वाटपाच्या दुसर्‍या फेरीतील यादी प्रकाशित; थेट लिंकच्या माध्यमातून तपासा लिस्ट

CLAT Round 2 Allotment Result 2024 : नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या कन्सोर्टियमने CLAT 2024 समुपदेशन फेरी-२ च्या जागा वाटपाचे निकाल आज, ८ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी CLAT समुपदेशन फेरीसाठी अर्ज केला आहे.ते सीएलएटी (CLAT) च्या अधिकृत ते वेबसाइटच्या माध्यमातून फेरी २ मधील जागा वाटपाचा निकाल पाहू शकतात.

CLAT राउंड 2 प्रोविजनल अलॉटमेंट रिजल्ट 2024 मध्ये सहभागी प्रत्येक NLU साठी स्वतंत्रपणे घोषित करण्यात आला आहे. उमेदवारांना योग्य लिंकवर क्लिक करून वाटप PDF डाउनलोड करावे लागेल. CLAT समुपदेशन 2024 फेरी २ वाटप यादीमध्ये उमेदवाराचा दर्जा, प्रवेशपत्र क्रमांक आणि आरक्षण तपशील समाविष्ट आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार जागा वाटप करण्यात आल्या आहेत ते आजपासून १२ जानेवारी २०२४ पर्यंत वाटप केलेल्या विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी त्या त्या संस्था अथवा महाविद्यालयामध्ये संपर्क साध शकतात. सदर साठेत विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क जमा करावे लागेल आणि दिलेल्या वेळेत पुढील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

CLAT 2024 फेरी 2 वाटप निकाल असा तपासा :

उमेदवारांसाठी CLAT 2024 फेरी २ तात्पुरती वाटप गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी लिंक आता अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांनी वाटपासाठी अर्ज केला आहे ते निकाल तपासण्यासाठी येथे दिलेल्या पायर्‍यांचे अनुसरण करू शकतात.

पायरी १ : CLAT 2024 समुपदेशनाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
पायरी २ : CLAT 2024 फेरी 2 वाटप निकालावर क्लिक करा.
पायरी ३ : संबंधित NLU लिंकवर क्लिक करा.
पायरी ४ : आता वाटप PDF तुमच्या समोर प्रदर्शित होईल.
पायरी ५ : पुढील संदर्भासाठी CLAT फेरी 2 वाटप निकाल डाउनलोड करा.
यादी तपासण्यासाठी थेट लिंक :
ही कागदपत्रे तुमच्याकडे तयार ठेवा :

ज्या विद्यार्थ्यांना CLAT 2024 समुपदेशनात जागा वाटप करण्यात आल्या आहेत त्यांनी त्यांच्या दहावी आणि बारावी च्या गुणपत्रिका तयार ठेवाव्यात. याव्यतिरिक्त, CLAT 2024 प्रवेशपत्र, पूर्वीच्या शैक्षणिक संस्थेचे चारित्र्य प्रमाणपत्र (Character Certificate), त्यांचे हस्तांतरण किंवा स्थलांतर प्रमाणपत्र (Migration or Transfer Certificate), जात प्रमाणपत्र, PWD किंवा SAP प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्रांसारखे अधिवास किंवा निवासी कागदपत्रे देखील आवश्यक असतील.

Source link

clat 2024clat 2024 2nd listclat 2024 allotmentclat 2024 round 2clat seat allotmentCommon Law Admission Testक्लॅट २०२४सामान्य कायदा प्रवेश परीक्षा
Comments (0)
Add Comment