पडक्या घरात व्यक्तींचा नको तो उद्योग, पोलिसांना कुणकुण, छापा टाकताच लोकांची पळापळ अन्…

धुळे: शहरातील पवन नगरात काल रात्री साडेअकराच्या सुमारास चाळीसगावरोड पोलिसांनी छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत जुगाऱ्यांच्या ताब्यातील ५३ हजार ३०० रूपयांची रोकडसह हजारो रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे. यातील जुगारअड्डा चालवणाऱ्या म्होरक्यासह त्यांच्या साथीदारांचा तपास सुरू आहे.
मैत्रिणीसोबत यात्रेत का फिरलास? युवकाला दोघांची विचारणा, वादाचे रुपांतर हाणामारीत, नंतर घडलं धक्कादायक कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगावरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवन नगरातील महादेव मंदिराजवळ एका पडक्या घराच्या आडोशाला काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती चाळीसगावरोड पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोहेकों पाथरवट यांनी पथक आणि पंचासह सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यांना काही इसम जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पोबारा केला. तर पथकाने आकाश प्रविण सोनवणे, रा. सहजीवन नगर, धुळे, जमीन रशीद अन्सारी, रा. स्लॉटर हाऊस मागे, धुळे, अश्पाक गुलाब सैय्यद, रा. जामचा मळा, धुळे, आयाज लतीफ शेख, रा. पवन नगर, धुळे यांना ताब्यात घेतले.

दिव्यांग मुलगी झाली म्हणून बापाने नाकारली मात्र आईने जिद्दीनं सांभाळली, मयुरीची प्रेरणादायी कहाणी

शरद परशुराम लाडे हा त्याच्या साथीदारांसह हा जुगार अड्डा चालवत होता. ताब्यात घेण्यात आलेल्या जुगाऱ्यांच्या अंगझडतीत ५३ हजार ३०० रूपयांची रोकड, मोबाईलसह जुगाराची साधने मिळून आली. पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांवर चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, एएसपी ऋषीकेश रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली पोनि धिरज महाजन, पोसई विनोद पवार, असई पाटील, पोहेकॉ सुनील पाथरवट, पोहेकॉ निलेश देवरे, पोकॉ स्वप्निल सोनवणे आणि चालक पोकॉ योगेश पाटील या पथकाने केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी यावेळी दिली.

Source link

dhule newspolice raid gamblingpolice raid gambling denpolice raid in dhuleraid gambling den in dhuleजुगार अड्ड्यावर छापाधुळे बातमीधुळ्यात जुगार अड्डाधुळ्यात जुगार अड्ड्यावर छापा
Comments (0)
Add Comment