संजय राऊतांनी कुणाकुणाची आयुष्य उद्ध्वस्त केली, याची यादीच देतो, विखे पाटील भडकले

अहमदनगर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महसूलमंत्री नव्हे हे तर आमसूल मंत्री अशा शब्दांत टीका केल्याने महसूल मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच संतप्त झाले. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे. राऊतांनी व्यक्तीगत आयुष्यात लक्ष घालून ज्यांचे आयुष्य उद्धवस्थ केले, त्यांची यादीच देतो, असेही विखे पाटील म्हणाले.

सोमवारी राऊत शिर्डीत आले होते. साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विखे पाटील यांच्या मतदारसंघात येऊन राऊत यांनी विखे पाटलांवरही नाव न घेता टीका केली. विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत राऊत म्हणाले, हे कसले महसूलमंत्री? हे तर आमसूल मंत्री.

विखे काय म्हणाले?

विखे पाटील सोमवारी नगर शहरात होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना यासंबंधी छेडले असता विखे पाटील म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना लवकरच वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे. राऊत यांनी आतापर्यंत अनेकांच्या व्यक्तिगत आयुष्यात भाग घेत त्यांची आयुष्य उध्वस्त केली आहेत. याची यादी मी जाहीर करणार आहे, असा इशारा विखे पाटील यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांवरील प्रश्न, सुळे लक्ष्य, राऊतांनी विखेंना सुनावलं, तुम्ही महसूलमंत्री नाही तर आमसूल मंत्री!
विखे पाटील पुढे म्हणाले, राऊत यांनी यापूर्वीही अनेक आरोप केले आहेत. मात्र, राजकारणामध्ये काही पथ्य पाळायला हवीत. आतापर्यंत आपण ती पाळत आलो आहोत. आज स्वर्गीय माधव गडकरी हयात असते तर त्यांनीही हेच सांगितले असते, असेही विखे पाटील म्हणाले.

Sharad Pawar: नगरसाठी पवार नव्या खेळीच्या तयारीत; उद्यापासून शिर्डीत ‘राष्ट्रवादी’चे शिबिर

राऊत नेमके काय म्हणाले होते?

खासदार सुप्रिया सुळे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, खासदार सुळे यांची मागणी योग्यच आहे. मात्र, त्यावर अगोदर लवासाची श्वेतपत्रिका काढा म्हणणारे महसूलमंत्री नाही तर आमसूलमंत्री आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.

अगोदर शिवसेनेत होते, मग काँग्रेसमधून भाजपत आले, राऊतांनी विखे पाटलांच्या पक्षांतराचा इतिहास काढला

Source link

radhakrishna vikheSanjay Rautsanjay raut taunt radhakrishna vikhe patilshivsena mp sanjay rautराधाकृष्ण विखे-पाटीलविखे पाटीलसंजय राऊत
Comments (0)
Add Comment