या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १८ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ भरती २०२४ मधील पदे आणि पदसंख्या –
वरिष्ठ सल्लागार – ०३ जागा
सल्लागार/ वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – ०७ जागा
व्यवस्थापक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ११ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वेतन –
वरिष्ठ सल्लागार – ९० हजार ते २ लाख ४० हजार
सल्लागार/व्यवस्थापक – ८० हजार ते २ लाख २० हजार
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – ७० हजार ते २ लाख
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डीवाय. जनरल मॅनेजर (PL-TA, G आणि GA) ब्लॉक ‘ई’, तळमजला, प्रशासन इमारत, स्टील प्लांट, राउरकेला- ७६९०११. (ओडिशा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १८ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.