बंद दुकानाला आग लागली, मालक धावत गेले, शटर उघडताच ज्वाळांमध्ये अडकले; होरपळून मृत्यू

परभणी : परभणीच्या मानवत शहरात ‘मुंबई टेलरिंग’ दुकानाला आग लागल्याची घटना घडली. दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच दुकान मालकाने शटर उघडले. या आगीत ३० टक्के भाजलेल्या मालकाचा उपचारादरम्यान नांदेड येथे मृत्यू झाला आहे.

या आगीमध्ये १७ लाख रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचा दावा केला जात आहे. जावेद मन्नान मणियार असे आगीत भाजून मृत्यू झालेल्या दुकान मालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परभणीच्या मानवत शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की मानवत शहरातील देवी रोड मंदिर परिसरामध्ये असलेल्या मुंबई टेलरिंग दुकानाला ३१ डिसेंबर रोजी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली होती. या आगीची माहिती दुकानाचे मालक जावेद मन्नान मणियार यांना मिळाल्यानंतर त्यांनी दुकानाकडे धाव घेतली.

दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याने त्यांनी आग विझवण्यासाठी दुकानाचे शटर उघडले. शटर उघडत असताना जावेद मन्नान मणियार हे दुकानाच्या आगीमध्ये ३० टक्के भाजले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना प्रथम मानवत येथे रुग्णालयामध्ये दाखल केले.

पुण्यातली चिमुकली भावंडं खेळताना स्मशानभूमीजवळ पोहोचली, गोंगाटाने बावचळली, पण इतक्यात…
मानवत येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले. मात्र त्यांच्या छातीचा भाग भाजला असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले. या ठिकाणी मनियार यांच्यावर सात दिवस डॉक्टरांनी उपचार केले. तरीपण मनियार यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत जात होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा सातव्या दिवशी मृत्यू झाला.

हॉर्न वाजवल्याचा राग, पुण्यात तिघांची भररस्त्यात मारहाण, तरुणाचे तीन दात पाडले
दुकानाला लागलेल्या आगीमध्ये दुकानातील १७ लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. दरम्यान आगीमध्ये भाजलेल्या मनियार यांचा उपचारादरम्यान सातव्या दिवशी मृत्यू झाला असल्याने मानवत शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील कर्त्या पुरुषाचा असा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने मणियार कुटुंब उघड्यावर आले आहे.

छ. संभाजीनगरमध्ये हातमोजे बनवणाऱ्या कंपनीत अग्नितांडव, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

parbhani fireparbhani newstailoring shop fireटेलर दुकान आगपरभणी आगपरभणी बातम्या
Comments (0)
Add Comment