हायलाइट्स:
- गणेशोत्सवासाठी गावी निघालात तर आधी वाचा ही बातमी
- तुम्हीही जर गणपतीसाठी कोकणात येणार असाल तर
- …अन्यथा परत यावं लागेल घरी
सिंधुदूर्ग : गणेश चतुर्थीच्या वेळी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. करोनाचा धोका रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे नियम आखण्यात आले आहेत. त्यानुसार आता गणपतीच्या सणाला सिंधुदूर्गात येण्यासाठी लसीचे दोन्हीही डोस पूर्ण झालेले असणे महत्त्वाचे आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन डॉस पूर्ण असणाऱ्यांना आणि प्रमाणपत्र असणाऱ्यांनात जिल्ह्यात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे तुम्हीही जर गणपतीसाठी कोकणात येणार असाल तर लसीकरण होणं महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला पुन्हा घरी जाण्याची वेळ येऊ शकते.
अधिक माहितीनुसार, १८ वर्षातील नागरिकांचे लसीकरण नसल्याने त्या सर्वांना प्रवेश देण्यात येणार असून ७२ तास अगोदरची आरटिपीसीआर चाचणी करणंदेखील बंधनकारकर असणार आहे. ज्याच्याकडे चाचणी रिपोर्ट नसेल अशा नागरिकांसाठी अँटीजेन टेस्टकरिता सुविधा करण्यात येणार असल्याची माहितीदेखील उदय सामंत यांनी दिली आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाचणीमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास संस्थात्मक नियमाप्रमाणे विलगिकरर्ण करण्यात येईल. करोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी या नियमांचं पालन करणं आवश्यक असून यावर्षी गणेश चतुर्थी साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कोकण रेल्वे स्थानकावर गर्दी टाळण्यासाठी तीन रांगा असणार आहेत. यामध्ये दोन डोसचे प्रमाणपत्र असलेले, आरटीपीसीआर ७२ तासातील टेस्ट असलेले आणि अचानक आलेले त्यांची टेस्ट करणारी रांग असे तीन टप्पे असणार आहेत.
मागील वर्षातील खारेपाटण इथे पाच ते सहा किलोमीटर लांब वाहनांच्या रागाचा अनुभव असल्याने चाकरमान्यांना तपासणी नाक्यावर स्वतंत्र व्यवस्था मधूबन हॉटेल इथे एसटी तपासणी नाका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जवळील सर्व्हीस रोड व्हेईकल करीता तपासणी यातून गर्दी टाळण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्व अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन गणेशोत्सव काळात सतर्क रहावे अशा सूचना आणि करोनाचा नियम पाळण्याची माहिती दिली आहे.