Oppo Find X7, Oppo Find X7 Ultra ची किंमत
Oppo Find X7 Ultra चा १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज मॉडेल चीनमध्ये ५,९९९ युआन (जवळपास ७०,००० रुपये) मध्ये उपलब्ध आहे. १६ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ६,४९९ युआन (जवळपास ७५,००० रुपये) आहे. तर १६ जीबी रॅम व ५१२ जीबी मॉडेल ६,९९९ युआन (जवळपास ८०,००० रुपये) मध्ये उपलब्ध होईल. फोन पाइन शॅडो , सिल्व्हर मून, वास्ट सी सारखे कलर्स मध्ये आला आहे.
Oppo Find X7 च्या १२ जीबी रॅम व २५६ जीबी मॉडेलची किंमत ३,९९९ युआन (जवळपास ४६,००० रुपये) आहेत. ह्याचा १६ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ४,२९९ युआन (जवळपास ५०,००० रुपये) मध्ये मिळेल. कंपनीनं १६ जीबी रॅम व ५१२ जीबी आणि १६ जीबी व १ टीबी मॉडेल देखील आणले आहेत. ज्यांची किंमत अनुक्रमे ४,५९९ युआन (जवळपास ५३,००० रुपये) आणि ४,९९९ युआन (जवळपास ५८,००० रुपये) आहे. ग्लोबल मार्केटमध्ये ही सीरिज कधी येईल हे सांगता येत नाही.
Oppo Find X7 Ultra specifications
Oppo Find X7 Ultra स्मार्टफोन अँड्रॉइड १४ ओएसवर बेस्ड कलरओएस १४.० वर चालतो. ह्यात ६.८२ इंचाचा QHD (१४४०x३,१६८ पिक्सल) अॅमोलेड एलटीपीओ डिस्प्ले आहे. पीक ब्राइटनेस ४५०० निट्स आहे आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर सह बाजारात आला आहे, सोबत १६ जीबी रॅम आहे.
Oppo Find X7 Ultra पहिला स्मार्टफोन आहे, ज्यात २ पेरिस्कोप कॅमेरा आहेत. हा पहिला फोन आहे, ज्यात १ इंचाचा सोनी LYT-900 सेन्सर आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचे ४ कॅमेरे आहेत. फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. आयपी६८ रेटिंग देखील फोनला मिळाली आहे. Oppo Find X7 Ultra मध्ये ५,००० एमएएचची बॅटरी आहे. हा १००वॉट सुपरवूक चार्जिंग आणि ५० वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.
Oppo Find X7 specifications
Oppo Find X7 देखील अँड्रॉइड १४ ओएसवर चालतो. ह्यात ६.७८ इंचाचा १.५के अॅमाेलेड डिस्प्ले आहे. ह्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आणि पीक ब्राइटनेस ४५०० निट्स आहे. फोनमध्ये मीडियाटेकचा डायमेंसिटी ९३०० प्रोसेसर आहे, सोबत १६जीबी रॅम देण्यात आला आहे.
Oppo Find X7 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. मेन कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. सोबत ५० एमपीची अल्ट्रा वाइड लेन्स आणि ६४ एमपीचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा ३२ एमपीचा आहे. Oppo Find X7 मध्ये ५,००० एमएएचची बॅटरी आहे. जी १०० वॉट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.