महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई विभागासाठी ही भरती होणार असून याद्वारे एकूण १४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून २८ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई २०२४ भरती’ मधील पदे आणि पदसंख्या –
पवातावरणीय बदल आणि शाश्वतता तज्ञ – ०१ जागा
माहिती व तंत्रज्ञान तज्ञ – ०१ जागा
माहिती व तंत्रज्ञान असोसिएट -०१ जागा
माहिती/शिक्षण आणि संवाद व कंटेन्ट लेखक असोसिएट – ०१ जागा
विभागीय तांत्रिक तज्ञ – ०१ जागा
वातावरणीय वित्त तज्ञ – ०१ जागा
प्रकल्प सल्लागार / अधिकारी – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १४ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वेतन – (मासिक)
वातावरणीय बदल आणि शाश्चतता तज्ञ – ७५ हजार
माहिती व तंत्रज्ञान तज्ञ – ६५ हजार
माहिती व तंत्रज्ञान असोसिएट – ३५ हजार
माहिती/शिक्षण आणि संवाद व कंटेन्ट लेखक असोसिएट – ३५ हजार
विभागीय तांत्रिक तज्ञ – ४५ हजार
वातावरणीय वित्त तज्ञ – ०१ लाख
प्रकल्प सल्लागार / अधिकारी – ७५ हजार
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
वातावरणीय वित्त तज्ञ आणि प्रकल्प सल्लागार या दोन पदांसंदर्भात अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २८ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.