खासदारकीचा राजीनामा का दिलेला ते यंदाच्या लोकसभेची उमेदवारी, उदयनराजे भोसले म्हणतात..

सातारा : आजपर्यंत लोकसभा लढलो, आवर्जून सांगतो, प्रत्येकाने सांगितले, खासदारकीचा राजीनामा देऊन “उदयनराजे तुम्ही आत्महत्या करत आहात.” सरपंचपदाचा पण कोण राजीनामा देत नाही. शेवटच्या तीन महिन्यात कुणीही राजीनामा देईल. पण, मी निवडून आल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात राजीनामा दिला. याचे कारण माझी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी बांधिलकी आहे, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या उपस्थितीत खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना रथयात्रेस उदयनराजे यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. त्यावेळी ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

उदयनराजे म्हणाले, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे विचार आचरणात आणतो, त्यांच्या विचारांशी मी सहमत आहे. मी राजकारण कधी केले नाही व करणारही नाही. मी समाजकारण करणारा माणूस आहे. लोकांचे हित जोपासले जाईल, हाच माझा प्रयत्न असतो. जे विचार मला पटत नाही, त्यांच्यासोबत राहणं… जी बाब मला पटत नाही ते उघडपणे सांगितलं. त्यानंतर मी “घरचा आहेर” दिला म्हणून चर्चा व्हायची. लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा लोकं आपणाला निवडून देतात, तेव्हा आपलंही कर्तव्य असतं त्या लोकांच्या नजरेत पडू नये. परंतु, जो माणूस स्वत:च्या नजरेत पडतो, तेव्हा कुणाला तोंड दाखवू शकत नाही आणि हे मी करणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

उदयनराजेंनी दिल्लीतील मोदींच्या भेटीचा केला खुलासा

उदयनराजे भोसले काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. तेव्हा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली, तसेच सारथी योजनेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून मराठा समाजातील युवकांनी उद्योग निर्माण करावे. त्यामुळे उद्योगधंदे सुरू करून मराठा समाजातील युवकांनी स्वावलंबी बनावे, तसेच रोजगार मिळवण्यापेक्षा रोजगार देणारे बनावे, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं.
पश्चिम बंगालमध्ये होणार मोठी कारवाई; अधिकाऱ्यांवर हल्ला, चौकशीसाठी EDचे डायरेक्टर दाखल

उदयनराजेंची मिश्किल टिप्पणी

अनेकजण यांनी खासदार उदयराजे भोसले यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे, पण स्वतः उदयनराजे अद्याप काही बोलले नाहीत, यावर उदयनराजे म्हणाले… ज्या ज्या लोकांनी इच्छा व्यक्त केल्यात त्या लोकांनी माझ्यासाठी केल्या आहेत, असे सांगताच पत्रकार, कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.
शिवीगाळ केली, कार्यालयात नेलं आणि मारहाण केली, माथाडी नेत्याचा अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप

प्रचाराचा नारळ फुटला?

जलमंदिर येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना रथयात्रेस उदयनराजे यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात केली. प्रत्येक रथावर जनजागृतीसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर उदयनराजे भोसले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले होते. एकंदरीत सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून उदयनराजे यांचे नाव घोषित झाल्याचे अप्रत्यक्षपणे निदर्शनास येत होते. तसा उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही उत्साह वाढत होता. आज प्रचाराचा नारळ फुटल्याचा एक माहोल निर्माण झाला होता. त्याला खुद्द केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्राच साक्षीदार होते.
इशान किशनला बीसीसीआयने थेट संघाबाहेर का केलं, खरं कारण आहे तरी काय जाणून घ्या…
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

BJP newssatara lok sabha seatudayanraje bhonsleउदयनराजे भोसलेलोकसभा निवडणूक २०१९लोकसभा निवडणूक २०२४सातारा बातम्यासातारा लोकसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment