दारु पिताना शिव्या दिल्या म्हणून तरुणाला राग आला, मित्रासोबत धक्कादायक कृत्य

ठाणे: कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या म्हारळ गावात नशेखोर मित्रांची ओली पार्टी सुरू होती. दारूची पार्टी रंगात आली असतानाच आपापसात शिवीगाळ झाल्याने मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात एकाने देशी कट्ट्याने गोळी झाडून राजन उर्फ जानू येरकर याची जागीच हत्या केली.
हाती धारदार शस्त्र घेत रिल्स बनवली; तरुणाचा दहशत माजवण्याच प्रयत्न, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम
या घटनेनंतर तालुका पोलिसांनी रोहित भालेकर आणि समीर चव्हाण या दोघांना अवघ्या काही तासांतच अटक केली. यातील परवेज शेख आणि सुनिल वाघमारे या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. यातील चारपैकी तिघे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण जवळच्या ग्रामीण भागातील म्हारळ गावात असलेल्या सूर्यानगर परिसरात रोहित भालेकर, परवेज शेख, सुनिल वाघमारे, समिर चव्हाण आणि राजन येरकर हे पाच नशेखोर दारु पित बसले होते. दारु पार्टी सुरु असताना आपापसात शिवीगाळ झाल्याने राजन आणि एका मित्रामध्ये वाद झाला. याच दरम्यान संतापलेल्या रोहित भालेकर याने परवेजच्या कमरेला खोचलेल्या देशी कट्ट्यातून राजन येरकर याच्यावर गोळी झाडली.

खोटं बोलणारी व्यक्ती, महाराष्ट्रासाठी नव्हे तर सत्तेसाठी काम करतात, आदित्य ठाकरेंचा केसरकरांवर पलटवार

या गोळीबारात राजन येरकर हा घटनास्थळीच ठार झाला. या प्रकरणी टिटवाळ्यातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंगटे यांच्या पथकाने रोहित भालेकर आणि समिर चव्हाण या दोघांना अटक केली. मात्र या प्रकरणातील सुनिल आणि परवेज हे दोघे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर म्हारळ परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Source link

kalyan crimeKalyan newsmharal murder newsThane newsकल्याण बातमीकल्याण हत्या बातमीठाणे बातमीम्हारळ हत्या प्रकरण
Comments (0)
Add Comment