या मुख्य मूर्तीचे कोरीव काम करण्यासाठी देशभरातील दिग्गज चित्रकारांना राम लल्लाचे चित्र रेखाटण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार देशभरातील अनेक चित्रकारांनी मूर्ती तयार करण्यासाठी आपल्या कल्पकतेचा विचार करून चित्र साकारले. मात्र समितीने या चित्रांचे परीक्षण केल्यानंतर देशभरातील चार चित्रकारांचे चित्र स्वीकारले. त्यात मुंबईचे वासुदेव कामत आणि बदलापूरचे सचिन जुवाटकर यांच्या चित्राचा समावेश होता. तर समितीशी संलग्न असलेले चित्रकार विश्वकर्मा यांच्या देखील चित्राचा महत्त्वाचा भाग मूर्ती तयार करताना स्वीकारण्यात आला. देशभरातील चार दिग्गज कलाकारांनी साकारलेल्या चित्राच्या आधारावरच अयोध्येतील राम लल्लाची मूर्ती साकारण्यात आली आहे. ज्यांच्या देखरेखीखाली राम मंदिराची उभारणी केली जात आहे.
ते डॉक्टर सच्चिदानंद जोशी यांच्यामुळेच आपल्याला राम लल्लाची सेवा करण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया जुवाटकर यांनी दिली. राम मंदिराची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. ती मूर्ती पाच ते सहा वर्ष वयोगटातील रामाची मूर्ती असून त्या वयोमानानुसारच चित्र साकारण्यात आले होते. जुवाटकर यांनी राम राम लल्लाचे रेखाटलेले चित्र आपल्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समितीकडे सादर केल्यानंतर त्यांच्या सूचनांचा आदर समितीने केला. जी मूळ मूर्ती साकारण्यात येत आहे त्यात जुवाटकर यांनी आपल्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून केलेल्या काही सूचनांचा देखील सहभाग करून घेण्यात आला आहे.
अयोध्यात साकारण्यात आलेल्या राम लल्लाच्या मूर्तीसाठी जे चित्र निश्चित करण्यात आले आहे. त्या चित्राचा वापर मुख्य निमंत्रण पत्रिकेवर देखील करण्यात आला आहे.” राम लल्लाची मूर्ती साकारण्यासाठी जे चित्र अपेक्षित होते ते चित्र पाठवण्यासाठी मला कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कल्पना दिली. त्यांच्यामुळेच आज आपल्या चित्राचा काही भाग राम लल्लाचा मूर्तीत वापरल्याचा आपल्याला कायमस्वरूपी आनंद आहे, असे ते म्हणाले आहेत.