नवी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी माथाडी सेनेच्या नेत्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. दादर येथील राजगड कार्यालयात अमित ठाकरे यांच्यासह इतर काही जणांनी माथाडी नेते महेश जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत महेश जाधव गंभीर जखमी असून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
मनसेचे पदाधिकारी तथा माथाडी नेते महेश जाधव हे माथाडी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात अमित ठाकरे यांच्याकडे गेले असता परप्रांतियांना सहकार्य करावंच लागेल, असं म्हणत महेश जाधव यांना दादर येथील राजगड कार्यालयात अमित ठाकरेंसह इतर काही जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीत महेश जाधव गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.मनसेने मारहाणीचा आरोप फेटाळला
मनसेचे पदाधिकारी तथा माथाडी नेते महेश जाधव हे माथाडी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात अमित ठाकरे यांच्याकडे गेले असता परप्रांतियांना सहकार्य करावंच लागेल, असं म्हणत महेश जाधव यांना दादर येथील राजगड कार्यालयात अमित ठाकरेंसह इतर काही जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीत महेश जाधव गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.
दुसरीकडे महेश जाधव यांना अमित ठाकरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केल्याच्या आरोपानंतर खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलबाहेर संतापलेल्या माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली. महेश जाधव यांच्या समर्थनार्थ माथाडी कामगार चांगलेच आक्रमक झाले होते.
या सगळ्या घटनेनंतर मनसेची मराठी कामगार सेना बरखास्त करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच मनसेच्या मराठी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांची देखील हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसेचे पदाधिकारी आणि मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी अमित ठाकरेंवर आरोप केल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून आदेश देण्यात आले.
मनसेने मारहाणीचा आरोप फेटाळला
महेश जाधव हे बिल्डर लोकांकडून खंडणी मागायचे. त्यांना अनेक वेळा वाचवूनही ते राज आणि अमित साहेबांवर बोलतात, असा पलटवार करत मनसे नेते योगेश चिले यांनी मारहाणीचा आरोप फेटाळून लावला.