राज्यात हे सरकार टिकलं तर महाराष्ट्राचं मंत्रालय सूरतला नेतील ,आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरेंनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार अपात्रता निकाल, आगामी लोकसभा निवडणूक यासंदर्भात भाष्य केलं. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनलच्या बिल्डींगच्या उद्घाटनाला, एमटीएचलच्या उद्घाटनाला आणि दिघा स्थानकाच्या उद्घाटनाला वेळ नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्रावर एवढे अन्याय का सहन करतोय हा प्रश्न आहे, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. ईडी, सीबीआय आणि आयटीद्वारे सत्याच्या बाजूनं असणाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जो निकाल येणार आहे तो येणार आहे. अध्यक्ष स्वत: घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात. म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या बैठकीला गेले आहेत, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

ट्रिब्युनल म्हणून काम करताना तुम्ही अशी कृत्य करु शकत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. दीड वर्षांपासून हे प्रकरण खेचल्यानंतर न्याय काय मिळेल, जस्टीस डिलेड जस्टीस डिनाइड असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. नक्की जर तुम्ही पाहिलं तर इथं दोन प्रकार होऊ शकतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे त्याप्रमाणं गेले तर चाळीस गद्दार बाद झाले पाहिजेत. भाजपला संविधान बदलायचंय त्या प्रमाणं अध्यक्ष गेले तर आम्ही बाद होऊ, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पुणे लोकसभेची पोटनिवडणूक नाहीच, सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब, स्थगितीचं कारण काय?
हा प्रश्न आमच्याबद्दल नाही, ज्या जगात आपण भारत म्हणून लोकशाही म्हणून मानतो. त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
पत्रकारांनी मागील वेळी अध्यक्षांना गाठलं, प्रश्नांची सरबत्ती, राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीचं ठिकाण बदललं?
राज्यातील सरकार टिकलं तर मंत्रालय देखील सूरत आणि अहमदाबादला हलवतील, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही इंडिया आघाडी म्हणून देशभक्त पक्षांची आघाडी आहोत. आम्ही संविधान बदलू देणार नाही, आम्ही लोकशाही मारु देणार नाहीत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. सत्ता गेलं त्याचं दु:ख नाही. पक्ष फोडून सत्ता मिळवून देखील युवकांना रोजगार मिळवून शकत नसतील तर तुम्ही काय मिळवलंत. ४० गद्दारांचं करिअर संपवण्यात आलं आहे. ते पराभूत होतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

अमोल कोल्हेंविरोधात पार्थ पवारांना तिकीट, शिरूरमधून निवडणूक लढविण्याचा प्लॅन, दादांच्या मनात काय?

Source link

aaditya thackerayaaditya thackeray fbkolhapur news कोल्हापूर बातम्याshivsena newsshivsena ubtआदित्य ठाकरेआमदार अपात्रता प्रकरण
Comments (0)
Add Comment