राम मंदिर उभं राहिलंय, मलंग गडालाही मुख्यमंत्री मुक्ती देतील, श्रीकांत शिंदेंचं आश्वासन

कल्याण : कोणीच विचार केला नव्हता, आज राम मंदिर उभे राहत आहे. येणाऱ्या काळात मलंगगडाला देखील आपले मुख्यमंत्री मुक्ती देतील, असे आश्वासन मी देतो, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. कल्याण उसाटणे येथील मलंगगड हरीनाम उत्सवाच्या सांगता सोहळ्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग मुक्ती संदर्भात विधान केले होते. आता पुन्हा खासदार शिंदे यांनी मलंगमुक्ती संदर्भात वारकऱ्यांना आश्वासन दिले आहे.

कल्याणच्या मलंगगड परिसरातील उसाटणे येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. आज सप्तहाचा शेवटचा दिवस आहे. या कार्यक्रमानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भाषणात मलंगगड मुक्ती संदर्भात विधान करत सांगितले, की आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी भावना आहे, ती मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. त्याच्यावर काम देखील सुरु आहे. येणाऱ्या काळात आपल्या मनातील इच्छा पूर्ण होईल, असे मी या ठिकाणी खात्रीलायक सांगू शकतो.

२२ जानेवारीला दिवाळी साजरी करु, ‘त्या’ कुटुंबांना एक-एक हजार द्या, प्रकाश आंबेडकरांची मोदींकडे मागणी
अफजल खानाचा कोथळा दोन वेळा काढण्यात आला. पहिला कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला होता, तर प्रताप गडावरील अतिक्रमण या सरकारने काढत दुसऱ्यांदा अफजल खानाचा कोथळा काढला. हे जे काम धर्माचे काम आहे, येणारे पिढी ही चळवळ पुढे नेणार आहे, देशात राम मंदिर उभे राहत आहे, त्याचप्रमाणे या मलंगगडाला मुक्ती देखील आपले मुख्यमंत्री देतील, असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

श्रीकांत शिंदेकडून डोंबिवली पलावा जंक्शन पुलाची पाहाणी, अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

Eknath ShindeKalyan newsmalang gadshrikant shindeThane newsएकनाथ शिंदेमलंग गडराम मंदिरश्रीकांत शिंदे
Comments (0)
Add Comment