‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीने निष्पापाचा मृत्यू, पुण्यात डंपरखाली चिरडून तरुण ठार

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शिवाजी रस्त्यावर रामेश्वर चौकात ‘नो एन्ट्री’मधून जाणाऱ्या एका बेशिस्त दुचाकीस्वारामुळे समोरून येणाऱ्या निष्पाप दुचाकीस्वाराचा डंपरखाली चिरडून बळी गेला. शुभम दादासाहेब डोके (वय २१, रा. मगरपट्टा हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

शुभम हा फार्मसीचे शिक्षण घेत होता. तो सकाळी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आला होता. दर्शन घेऊन झाल्यावर दत्त मंदिराकडून रामेश्वर चौकाकडे जात असताना शुभमचा सकाळी साडेनऊ ते पावणेदहा या दरम्यान अपघात झाला. या प्रकरणी डंपरचालकासह ‘नो एन्ट्री’तून येणाऱ्या दुचाकीस्वारावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण पात्र, कोण अपात्र? शिवसेनेच्या आमदारांचे आज ठरणार भवितव्य; अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष
शिवाजी रस्त्यावर एकेरी वाहतूक आहे. शनिवार वाड्याकडून स्वारगेटकडे जाता येते. तर, शिवाजी रस्त्यावरील रामेश्वर चौकातून मंडईकडे आणि मंडईकडून रामेश्वर चौकमार्गे स्वारगेटकडे जाता येते. मात्र, रामेश्वर चौकातून दत्त मंदिराकडे बंदी असतानाही अनेक दुचाकीस्वार आणि रिक्षादेखील उलट दिशेने जात असतात. मंगळवारी सकाळीदेखील एक दुचाकीस्वार रामेश्वर चौकातून दत्त मंदिराकडे उलट दिशेने जाण्यासाठी वळाला. त्या वेळी समोरून एक डंपर आणि दुचाकीस्वार येत होते. उलट दिशेने आलेल्या दुचाकीस्वारामुळे शुभमला गाडीला ब्रेक लावावा लागला. यामुळे दुचाकी घसरून तो रस्त्यावर पडला. त्या वेळी शेजारून जाणाऱ्या डंपरचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने शुभमचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ‘नो-एंट्री’मध्ये उलट दिशेने जाणाऱ्या (पिवळा शर्ट) दुचाकीस्वार या अपघाताला कारणीभूत ठरला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताला कारणीभूत तीन गोष्टी

– सकाळी मध्यवस्तीत पडलेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. शुभमने ब्रेक लावल्यावर त्याची दुचाकी घसरली.

– ‘नो एन्ट्री’मध्ये घुसलेल्या दुचाकीस्वारामुळे शुभमला ब्रेक लावावा लागला.

– अवजड वाहनांना बंदी असतानाही डंपर बिनदिक्कत शिवाजी रस्त्याने जात होता.

वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

भरधाव वाहनाची धडक बसल्याने पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी परिसरात घडली. लखन बाळू गायकवाड (वय ३६, रा. कुंजीरवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी लखनचा चुलतभाऊ सागर (वय ३५) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी परिसरातून निघाले होते. नायगाव चौक ओलांडत असताना भरधाव वाहनाने लखन यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या लखन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अवमान, ‘केसरी टूर्स’कडून मालदीवच्या सहली रद्द; काय आहे प्रकरण?

Source link

accident newsPune Accident Newspune marathi newspune shivaji road accidentअपघात बातम्यापुणे अपघात बातम्यापुणे मराठी बातम्यापुणे शिवाजी रस्ता अपघात
Comments (0)
Add Comment