…तर मंत्रालयदेखील गुजरातला नेतील, आदित्य ठाकरे यांचा शिंदे- फडणवीस सरकारला टोला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘सध्याचे महाराष्ट्रातील सरकार टिकले; तर उद्या मंत्रालयदेखील गुजरातला नेतील,’ असा टोला युवा सेनेचे प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापुरात हाणला. ‘आमदार अपात्रतेप्रकरणी घटनेप्रमाणे न्याय दिल्यास चाळीस गद्दार आमदार बाद ठरू शकतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ठाकरे दोन दिवसाच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात गारगोटी व कोल्हापूर येथे त्यांच्या जाहीर सभा झाल्या. त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.ते म्हणाले, ‘उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायच असतो. तरीही उशिरा का होईना, आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी घटनेप्रमाणे न्याय दिल्यास चाळीस गद्दार बाद ठरू शकतील; पण या देशात दोन संविधान आहेत. एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे; तर दुसरे भाजपला नवीन लिहायचे आहे, भाजपच्या घटनेनुसार न्याय दिल्यास आम्ही बाद होऊ.’

कोण पात्र, कोण अपात्र? शिवसेनेच्या आमदारांचे आज ठरणार भवितव्य; अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष

विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणे म्हणजे न्यायमूर्ती आरोपीच्या भेटीला जाण्याचा प्रकार असल्याचा टोलाही त्यांनी मारला. या प्रकरणात सभापती आपले नाव खराब करून घेतील असे वाटत नाही असेही ते म्हणाले.

भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले, ‘राजकीय पक्ष फोडून, परिवार फोडून, अनेकांचे करिअर संपवून तुम्ही सत्ता चोरली; पण त्याचा उपयोग शेजारच्या गुजरातला होत आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जात आहेत. ही सत्ता टिकली तर उद्या मंत्रालयदेखील सुरत अहमदाबादला जाईल.’

तो येतोय ना.. चार लाख कोटी घेऊन येतोय; भर भाषणात आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्री शिंदेंची नक्कल

Source link

aditya thackerayDevendra FadnavisEknath ShindeKolhapur newsshivsena mla disqualification caseआदित्य ठाकरेएकनाथ शिंदेकोल्हापूर न्यूजशिवसेना आमदार अपात्रता सुनावणी
Comments (0)
Add Comment