मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी, एक लाखाहून अधिक आहे मासिक वेतन

Bombay High Court Recruitment 2024: मुंबई उच्च न्यायालय यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘जिल्हा न्यायाधीश’ या पदाच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत न्यायालय प्रशासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ०९ जानेवारी २०२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. तसेच, २३ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४ भरती’ मधील पदे आणि पदसंख्या –
जिल्हा न्यायाधीश – १९ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १९ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार कायदे विषयात पदवीधर असावा. तसेच उच्च न्यायालयात किमान ०७ वर्षांहून अधिक काळ वकिलीचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.

वेतन – १ लाख ४४ हजार ८४० ते १ लाख ९४ हजार ६६० रुपये (मासिक)

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जानेवारी २०२४

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘मुंबई उच्च न्यायालय’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती करिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २३ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

bhc recruitment 2024Bombay high courtbombay high court recruitment 2024recruitmentमुंबई उच्च न्यायालय नोकरीमुंबई उच्च न्यायालय भरती २०२३
Comments (0)
Add Comment