माटुंग्यात प्रवाशांची नाकाबंदी, झेड पूल तीन महिन्यांसाठी बंद

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मध्य रेल्वेवरील स्त्रीशक्ती संचलित आणि विद्यार्थी स्थानक अशी ओळख असलेल्या माटुंगा रेल्वेस्थानकात रेल्वेप्रवाशांचे हाल होत आहेत. माटुंग्यातील प्रसिद्ध झेड पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणास्तव तीन महिने बंद करण्यात आला आहे. यामुळे प. रेल्वेवरील माटुंगा रोडहून म. रेल्वेच्या माटुंगा स्थानकात येण्यासाठी प्रवाशांना दादर स्थानकाला वळसा घालून यावे लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात प्रवेश करण्यासाठी दादर दिशेला स्थानक पूर्वेकडे उतरणारा पादचारी पूल आहे. ठाणे दिशेला कबुतर खाना दिशेला (पूर्वेला) झेड पूल (पश्चिम) अशी जोडणी आहे. दादर दिशेकडील एकमेव पुलाच्या पायऱ्या दुरुस्तीसाठी डिसेंबरमध्ये बंद करण्यात आल्या आहेत. आता झेड पूलही बंद करण्यात आला आहे. पंतप्रधान गतिशक्ती प्रकल्पाअंतर्गत पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. स्थानकात प्रवेश करण्यासाठी प्रवाशांना कबुतरखान्याजवळील पादचारी पूलाचा एकच पर्याय उपलब्ध आहे. माटुंगा स्थानकात ये-जा करण्यासाठी प्रवाशांना संपूर्ण फलाट चालत जाण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

माटुंगा पूर्वेला रुईया, पोदार, वेलिंगकर, व्हीजेटीआय, खालसा अशी महाविद्यालये आहेत. पश्चिमेला रुपारेल महाविद्यालय आहेत. यामुळे स्थानकात कॉलेजच्या विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रोड स्थानकातून मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात येण्यासाठी रेल्वे प्रवासी, स्थानिक, फूड डिलिव्हरी करणारे कामगार आणि सायकलस्वार यांसाठी झेड पूलाचा मोठा आधार होता. पूल बंद झाल्यानंतर दादर स्थानकाला वळसा घालून माटुंग्यात पोहोचावे लागणार आहे.

क्रिकेट खेळताना खेळाडूच्या डोक्याला चेंडू लागला, काहीच वेळात क्रिकेटरचा मृत्यू
माटुंगा पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा झेड पूल बंद झाल्याने पूर्व – पश्चिम ये-जा करण्यासाठी तब्बल अडीच किलोमीटरचा वळसा घालून यावे लागते. रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यांनी ३ महिन्यांहून अधिक काळ पूल बंद राहण्याची शक्यता वर्तवली आहे. झेड पूल बंद असल्याने प्रवाशांना माटुंगा रोडवरून दादरला यावे लागते. मग दादरवरून कल्याण किंवा सीएसएमटीकरिता लोकल पकडावी लागत आहे. पुलाच्या दुरुस्तीबद्दल काही म्हणणे नाही. परंतु योग्य नियोजन करूनच दुरुस्तीची कामे हाती घेतली जावीत. प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सन २०१६ मध्ये मार्च ते एप्रिलदरम्यान सव्वा महिना हा पूल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुलावर सायकलस्वार स्टंट करत असल्याने पुलाच्या प्रवेशद्वारावर मार्च २०२२ मध्ये बॅरिकेडस उभारण्यात आले होते.

पंतप्रधान गतिशक्ती प्रकल्पाअंतर्गत झेडपुलाची देखभाल-दुरुस्ती काम सुरू करण्यात आले आहे. आगामी तीन महिने दुरुस्ती काम सुरू राहणार आहे. यामुळे झेड पूल पादचारी प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. याबाबत पुलाच्या दोन्ही प्रवेशाच्या ठिकाणी सूचना जाहीर करण्यात आली आहे. प्रवासी वापरासाठी स्थानकात पूर्वेकडील पादचारी पूल उपलब्ध आहे – डॉ. स्वप्नील निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

हार्वर्ड रिटर्न, AI एक्सपर्ट टॉप-१०० लिस्टमध्ये नाव; कशी पकडली गेली पोराची हत्या करणारी सूचना सेठ?
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

matunga railway stationmatunga z bridge closedmumbai live newsmumbai newsMumbai News LiveMumbai news today
Comments (0)
Add Comment