डोळ्यात मिरचीची पूड फेकून ८१ हजार रुपये असलेल्या बॅग चोरीचा प्रयत्न असफल…..

(संपादक:शैलेश चौधरी)

एरंडोल: पेट्रोल पंपाची ८१ हजार ५०० रुपये किंमतीचा भरणा दुचाकीने बँकेत भरण्यासाठी जाणाऱ्या इसमाच्या डोळ्यात मिरचीची पुड फेकून पैश्यांची बॅग लांबविण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.
या तरुणाच्या धाडसामुळे चोरांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला शुक्रवारी ३सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ही घटना घडली.
ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे तसेच ज्या स्थळी पैसे चोरीचा प्रयत्न झाला त्या परीसरातील हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले परंतु ते मर्यादित क्षेत्राचे कव्हरेज घेत असल्यामुळे आरोपी निष्पन्न होऊ शकले नाहीत.आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहीती एरंडोल पोलीस स्टेशन सुत्रांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पेट्रोल पंपाचा भरणा भरण्यासाठी मनोज सुनील देवरे हा पेट्रोल पंपावरील कर्मचारी (एम.एच१९ बि.यु ५३०७) क्रमांकाच्या दुचाकीने जात असतांना वाटेवर तीन माणसे त्याला हाताचा इशारा देऊन थांबण्यास सांगत होते परंतु तो न थांबल्यामुळे तिघांपैकी एकाने देवरे च्या दुचाकीला हात मारला व त्याच्या साथीदाराने देवरे याच्या तोंडावर मिरचीची पूड टाकली तर तिसऱ्या साथीदाराने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला पण देवरे याने तिघा आरोपींना न जुमानता व जीवाची पर्वा न करता एरंडोल शहराकडे दुचाकी पैशांच्या बॅगेसह नेली
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस लीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव,सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.

Comments (0)
Add Comment