‘महाहौसिंग’ मध्ये नोकरीची उत्तम संधी, जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

Maharashtra Housing Development Corporation Recruitment 2024: ‘महाहौसिंग’ म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘कायदेशीर फर्म / कायदेशीर सल्लागार’ पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबत ‘महाहौसिंग’ ने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १९ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीबाबतचे सर्व तपशील जाणून घेऊया.

‘महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
पदाचे नाव – कायदेशीर फर्म / कायदेशीर सल्लागार (पदसंख्या नमूद केलेली नाही)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार/ फार्म कायदेतज्ञ असावा. या व्यतिरिक्त विस्तृत तपशील महामंडळाच्या संकेतस्थळावर दिले आहे. संकेतस्थळाची लिंक खाली जोडली गेली आहे.

नोकरी ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी, कार्यालय: युनिट क्र. ३२, तिसरा मजला, साखर भवन, रामनाथ गोयंका मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२४

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १९ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

Maha Housing Recruitment 2024maharashtra housing development corporation jobsMHDC Recruitment 2024recruitmentमहाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ भरती २०२४महाहौसिंग भरती २०२४
Comments (0)
Add Comment