कोकणात राष्ट्रवादीला धक्का देत नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

हायलाइट्स:

  • खेड शहरात राष्ट्रवादीला मोठा धक्का
  • शहराध्यक्षाने केला शिवसेनेत प्रवेश
  • रामदास कदम यांच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन

खेड : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात राजकीय वारे वाहू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात राष्ट्रवादीला मोठा हादरा बसला असून खेड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक सतीश चिकणे यांनी शनिवारी ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सतीश चिकणे यांनी सकाळी जाहीर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आमदार रामदास कदम तसंच दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत खेड येथे आपल्या कार्यकर्त्यांसह चिकणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Sharad Pawar: करेक्ट कार्यक्रम करण्याचा राजू शेट्टींचा इशारा; शरद पवार म्हणाले…

सतीश चिकणे यांच्यासह त्यांचे वडील चिकणे गुरूजी यांचं खेड शहरासह खेड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस संघटन वाढवण्यासाठी मोठं योगदान आहे . त्यांचे वडील दिवंगत चिकणे गुरूजी हे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष राहिले होते. सतीश चिकणे हे देखील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक आहेत. खेड शहरासह तालुक्यात त्यांचा मोठा लोकसंपर्क आहे.

राष्ट्रवादीतील या महत्त्वाच्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केलेल्या खेड शहरात शिवसेना पक्ष संघटन अधिक मजबूत होणार आहे, असा विश्वास सेनेतील कार्यकर्त्यांकडूनही व्यक्त होत आहे. दरम्यान या पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून नेमकी काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source link

khed newsshivsena ncpखेडराष्ट्रवादीशिवसेना
Comments (0)
Add Comment