पात्र ठरलेले ते १६ आमदार कोण आहेत?
एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संदिपान भुमरे, तानाजी सावंत, यामिनी जाधव, लता सोनावणे, बालाजी कल्याणकर, बालाजी किणीकर, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, अनिल बाबर, समेश बोरनारे, भरत गोगावले
महत्त्वाचे मुद्दे
– कोणता गट खरा पक्ष हे विधिमंडळ पक्ष कोणाचा यावरून ठरवता येईल जेव्हा पक्षात फूट पडते.
२२ व २३ जून २०२२ रोजीचा शिंदे गटाचा ठराव विधिमंडळाच्या नोंदीवर आहे. ५५पैकी ३७ आमदार त्यांच्या गटात होते. म्हणून शिंदे गट हा खरा शिवसेना पक्ष होता २१ जून रोजी दोन गट निर्माण होऊन फूट पडली तेव्हा. भरत गोगावले हे वैध व्हिप होते, कारण २१ जून रोजी सुनील प्रभू यांचे व्हिप रद्द झाले.
– विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांची झालेली नियुक्ती वैध होती. त्यामुळे खरा पक्ष हा त्यांचाच आहे, हे स्पष्ट होते
– ते आमदार संपर्काबाहेर गेले होते, हा ठाकरे गटाचा युक्तिवाद मान्य होऊ शकत नाही. कारण कोणाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि कोणी प्रयत्न केला, याबद्दल ठाकरे गटाने कोणतेही पुरावे दिले नाहीत. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी कोणताही आधार नाही.
– मिलिंद नार्वेकर व रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे व अन्य नेत्यांना ठाकरे यांच्या सांगण्यावरून भेटायलाही गेले होते.. हे ठाकरे गटाकडून कबूलही करण्यात येत आहे. शिंदे गटातील तीन साक्षीदार आमदारांनीही हे साक्षीमध्ये सांगितले. त्यामुळे आमदार संपर्काबाहेर गेले होते, हा युक्तिवाद अमान्य करण्यासाठी हा एक आणखी आधार आहे.
– शिंदे गट हा खरा शिवसेना पक्ष. फुटीनंतर सुनील प्रभू हे व्हिप म्हणून अस्तित्वात राहिले नव्हते. त्यामुळे २१ जूनच्या बैठकीला ते हजर राहिले नाहीत या कारणाखाली त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकत नाही.