मधुर जैन ICAI CA Final परीक्षेत अव्वल ठरला आहे. त्याला ८०० पैकी ६९१ गुण मिळाले आहेत. तर, दुसऱ्या क्रमांकावर संस्कृती अतुल आहे. तिला ८०० पैकी पैकी ५९० गुण मिळाले आहेत. टिकेंद्र कुमार सिंगल आणि ऋषी मल्होत्रा हे दोघेही तिसर्या क्रमांकावर आहेत.
सीए फायनलच्या निकालानुसार दोन्ही गटात ९.४२ टक्के उमेदवार यशस्वी झाले आहेत. गट १ ची उत्तीर्णतेची टक्केवारी ९.४६ टक्के आहे, तर गट २ ची उत्तीर्णतेची टक्केवारी २१.६ टक्के आहे. दुसरीकडे, गट १ साठी सीए इंटर नोव्हेंबर २०२३ च्या उत्तीर्णतेची टक्केवारी १६.७८ टक्के आहे, तर गट २ साठी १९.१८ टक्के आहे. एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण ९.७३ टक्के आहे.
CA इंटर आणि फायनल निकालांव्यतिरिक्त, ICAI द्वारे गुणवत्ता आणि टॉपर्सची यादी देखील प्रसिद्ध केली गेली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने गट १ साठी २ नोव्हेंबर, ४ नोव्हेंबर, ६ नोव्हेंबर आणि ८ नोव्हेंबर रोजी आणि गट २ साठी १० नोव्हेंबर, १३ नोव्हेंबर, १५ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर रोजी सीए इंटरमीडिएट परीक्षा आयोजित केली होती. परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्यात आली. तर सीएची अंतिम परीक्षा १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत झाली.