आजचे पंचांग 11 जानेवारी 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति पौष २१, शक संवत १९४५, पौष कृष्ण, अमावस्या, गुरुवार, विक्रम संवत २०८० सौर पौष मास प्रविष्टे २७, जमादि-उल्सानी-२८, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ११ जानेवारी, २०२४. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतू. राहुकाल दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत

अमावस्या तिथी संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ. पूर्वाषाढा नक्षत्र सायंकाळी ५ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र प्रारंभ.

संध्याकाळी ५ वाजून ४९ मिनिटांपर्यंत व्याघात योग त्यानंतर हर्षण योग प्रारंभ. संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत नाग करण त्यानंतर बव करण प्रारंभ. रात्री ११ वाजून ५ मिनिटांपर्यंत चंद्र धनु राशीत त्यानंतर मकर राशीत भ्रमण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१५
  • सूर्यास्त: सायं. ६-१७
  • चंद्रोदय: सकाळी ७-०५
  • चंद्रास्त: सायं. ६-११
  • पूर्ण भरती: सकाळी ११-३३ पाण्याची उंची ३.८५ मीटर, रात्री १२-३० पाण्याची उंची ४.७६ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ५-५५ पाण्याची उंची १.९६ मीटर, सायं. ५-३७ पाण्याची उंची ०.३० मीटर.

दिनविशेष: दर्श वेळा अमावास्या, काळबादेवी यात्रा मुंबई,श्री. लालबहाद्दूर शास्त्री स्मृतिदिन.

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १३ मिनिटांपर्यंत ते २ वाजून ५५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिट ते दुसऱ्या दिवशी १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिट ते ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत.अमृत काळ दुपारी ७ वाजून १५ मिनिटे ते ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड. सकाळी सहा ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ४४ मिनिटे ते ११ वाजून २६ मिनिटांपर्यंत. त्यानंतर २ वाजून ५५ मिनिटे ते ३ वाजून ३७ मिनिटांपर्यंत.

उपाय: भगवान विष्णूंना तुळशीच्या मंजिरी अर्पण करा

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

marathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment