Pune Crime: लेकीनेच उकळली खंडणी!; आईचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून ‘ते’ फोटो-व्हिडिओ मिळवले आणि…

हायलाइट्स:

  • मित्रांच्या मदतीने मुलीनेच मागितली खंडणी.
  • आईचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करत रचला होता कट.
  • आईच्या प्रियकराला शिकवायचा होता धडा.

पुणे: आईसोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी मुलीनेच आईचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून दोघांचे खासगी फोटो मिळविले व ते फोटो मित्राला पाठवून त्याच्या आधारे संबंधित व्यावसायिकाला धमकावत १५ लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यावसायिकाने बदनामीच्या भीतीने तीन लाख रुपये दिले. परंतु, त्रास असह्य झाल्यामुळे पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर खंडणीची रक्कम घेताना आरोपीला पकडण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात महिलेच्या मुलीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. ( Pune Crime Latest News )

वाचा: बोईसर स्फोटाचं काळजाचा थरकाप उडवणारं दृष्य; ‘तो’ मृतदेह कुणाचा?

या प्रकरणात पोलिसांनी मिथून मोहन गायकवाड (वय २९, रा. कुरबावी, ता. माळशिरस) आणि कर्वेनगर येथील २१ वर्षीय तरुणी या दोघांना अटक केली आहे. तर, त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. या आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली. याबाबत एका ४२ वर्षीय व्यक्तीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा बिल्डिंग साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. मे महिन्यात दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या दुकानात आल्या. त्यांनी अगोदर बांधकाम साहित्याची चौकशी केली. त्यानंतर अचानक शिवीगाळ करत तुझे एका महिलेसोबतच्या संबंधाचे फोटो आमच्याकडे असल्याचे सांगितले. त्यांना कारमध्ये बसवून अलंकार पोलीस चौकीजवळ घेऊन गेले. त्यानंतर कारमध्ये मारहाण करून महिलेबाबत विचारणा करत सर्व माहिती काढून घेतली. त्यांचा मोबाइल हिसकावून घेत त्यामधील फोटो व व्हिडिओ घेतले. ते व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. प्रत्येक महिन्याला एक लाख व आठ महिन्यानंतर सर्व पैसे द्यायचे, असे धमकावले.

वाचा: सावकारी करत माजवली दहशत; पोलिसांनी छापा टाकल्यानंतर हाती लागलं घबाड

या घटनेनंतर तक्रारदार यांनी सर्व माहिती महिलेला सांगितली. त्यानंतर महिलेने हा सर्व प्रकार त्यांच्या मुलीस सांगितला. त्यानंतर आरोपींनी महिलेच्या मुलीस फोन करून तक्रारदार यांना एक लाख रुपये घेऊन कात्रज परिसरात येण्यास सांगितले. आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले. तक्रारदार यांना आरोपींचा त्रास वाढल्यामुळे त्यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार त्यांनी खंडणी विरोधी पथकाला तपास करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सहायक निरीक्षक संदीप बुवा यांनी तक्रारदार यांच्या सांगण्यानुसार तपासाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना सुरुवातीला मुलीवरच संशय आला होता. तिची गोपनीय माहिती काढली असता ती आरोपीच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. तरीही पोलिसांनी तिला समजू दिले नाही. आरोपीचा पैसे मागण्यासाठी फोन आल्यानंतर पहिल्यांदा डेक्कन परिसरात सापळा रचला. पण, आरोपींनी त्या ठिकाणी पैसे न घेता दगडूशेठ गणपती मंदिर परिसराजवळ पैसे देण्यास बोलविले. त्याठिकाणी आरोपी गायकवाड याला पैसे घेताना अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तरुणीच्या सांगण्यावरून हा सर्व कट रचल्याचे उघडकीस आले.

वाचा: ईडीचा असा गैरवापर कधीच झाला नाही!; पवारांनी केला ‘हा’ गंभीर आरोप

Source link

girl hacked mothers whatsappPune crimepune crime latest newspune crime latest updatepune extortion latest newsआईचे व्हॉट्सअॅप हॅककर्वेनगरमिथून मोहन गायकवाडविश्रामबाग पोलीसश्रीनिवास घाडगे
Comments (0)
Add Comment