शरद मोहोळ हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांकडून प्लँचेटचा वापर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील हल्लेखोर आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली. ‘सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण व्हावी, यासाठी आरोपींनी जाणीवपूर्वक सीसीटीव्हीसमोर येऊन शरद मोहोळचा खून केला. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे. त्यामुळे आरोपींच्या बँक खात्याची माहिती घ्यायची आहे, तसेच आरोपींना कट रचण्यासाठी कोणी मदत केली, त्यामागचा ‘मास्टरमाइंड’ शोधायचा आहे,’ असे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले.

साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २०, रा. शिवशक्तीनगर, सुतारदरा), नामदेव महिपती कानगुडे (वय ३५, रा. भूगाव, मुळशी), अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे (वय २४, रा. स्वराज्य मित्र मंडळाजवळ, पर्वती), चंद्रकांत शाहू शेळके (वय २२, रा. जनता वसाहत, पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय २०, रा. पौड, मुळशी), विठ्ठल किसन गांदले (वय ३४, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा) अशी पोलिस कोठडीत वाढ केलेल्या आरोपींची नावे आहेत. मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून, त्यापैकी या सहा जणांना न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने या आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
उद्योगांची गंगा गुजरातला; व्हायब्रंट गुजरात परिषदेत उद्योगसमूह करणार कोट्यवधींची गुंतवणूक
मोहोळ खून प्रकरणातील आरोपींविरोधात १२० ब (कट रचणे) हे अतिरिक्त कलम लावण्यात यावे, असा अर्ज तपास अधिकाऱ्यांनी सादर केला आहे. ‘या आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी मुळशी तालुक्यात दोन-तीन ठिकाणी गोळीबाराचा सराव केला असून, ती ठिकाणे शोधायची आहेत. एका व्यक्तीने आरोपीला सीमकार्ड दिले असून, त्याद्वारे आरोपींनी काही कॉल केले आहेत. त्या व्यक्तीचा शोध घ्यायचा आहे. आरोपींनी रिक्षाचा वापर केला असून, त्या रिक्षाचालकाचाही शोध घ्यायचा आहे. आरोपी व साक्षीदारांची समोरासमोर चौकशी गरजेची आहे. त्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करावी,’ अशी मागणी गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त व तपास अधिकारी सुनील तांबे यांनी केली.

सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव व तक्रारदारांचे वकील अॅड. गोपाल भोसले यांनी यांनी तपासातील प्रगती पाहता आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढीची मागणी केली. बचाव पक्षाचे वकील अॅड. केतन कदम यांनी त्याला विरोध दर्शविला. ‘आरोपींची पोलिस कोठडी वाढविण्यासाठी तपास अधिकारी गृहितकावर आधारित जुनीच कारणे देत असून, बँक स्टेटमेंट, सीसीटीव्ही चित्रीकरण आदी तांत्रिक पुरावे पडताळण्यासाठी आरोपींच्या प्रत्यक्ष कोठडीची गरज नाही. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी,’ अशी मागणी अॅड. कदम यांनी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर आरोपींच्या पोलिस कोठडीत आठवडाभराची वाढ केली.

बचाव पक्षाकडून ‘प्लँचेट’चे आरोप

‘पोलिसांकडून आरोपींची पोलिस कोठडी मागितली जाते. त्यानंतर वेगळ्याच गोष्टी ‘रेकॉर्ड’वर येतात. पोलिस ‘प्लँचेट’ही करतात,’ असा आरोप बचाव पक्षाचे वकील अॅड. केतन कदम यांनी युक्तिवादादरम्यान केला. त्यावर ‘या गुन्ह्याच्या तपासात कोठेही ‘प्लँचेट’चा वापर केलेला नाही, ही बाब बचाव पक्षाच्या वकिलांच्या आरोपामुळे नोंदीवर घ्यावी,’ अशी विनंती तपास अधिकारी सुनील तांबे यांनी केली. सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनीही बचाव पक्षाचे आरोप खोडून काढले.

पिस्तुल पुरवणारे दोघे ताब्यात

या गुन्ह्यात तीन पिस्तुले वापरण्यात आली होती. आरोपींना ही पिस्तुले कोणी पुरवली, याचा गुन्हे शाखेकडून शोध घेण्यात येत होता. दरम्यान, गुन्हे शाखेने पिस्तुल पुरवल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.

आमची घटना अवैध, मग आमदार वैध कसे? राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची सडकून टीका

Source link

mohol murder police use planchetsPune crime newsPune Policesharad mohol murder updatesपुणे क्राइम बातम्यापुणे पोलीसमोहोळ मर्डर पोलीस प्लँचेटशरद मोहोळ मर्डर अपडेट्स
Comments (0)
Add Comment