नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

National Thermal Power Corporation Limited Recruitment 2024: एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती द्वारे ‘जीडीएमओ आणि वैद्यकीय विशेषज्ञ’ या पदांच्या एकूण ६१ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत ‘एनटीपीसी’ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज प्रक्रिया १० जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, २४ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि वेतन याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
जीडीएमओ (GDMO) – २० जागा
वैद्यकीय विशेषज्ञ – ४१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ६१ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयात एमबीबीएस किंवा एमडी/ डीएनबी असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता जाहिरातीत नमूद केली आहे. जाहिरात वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतनश्रेणी –
जीडीएमओ – ५० हजार ते १ लाख ६० हजार
वैद्यकीय विशेषज्ञ – ७० हजार ते २ लाख ( E4 Grade) आणि ६० हजार ते १ लाख ८० हजार (E3 Grade)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – १० जानेवारी २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ जानेवारी २०२४

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २४ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

National Thermal Power Corporation Limited JOBSNTPC Bharti 2024ntpc jobNTPC Recruitment 2024recruitmentनॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन भरती
Comments (0)
Add Comment