परंतु, ज्या शाळेत तुमचा मुलगा शिकत आहे आणि तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी भरमसाठ फी भरत आहात, तर त्या शाळेची सरकारी पोर्टलवर नोंदणी आहे की नाही हे तपासणे फार गरजेचे आहे. कारण, शाळेकडून मिळालेल्या बोर्डाच्या मार्कशीट आणि प्रमाणपत्राला वैधता नसेल तर, ही कागदपत्रे अवैद्य ठरून, कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण हे खरे आहे की, देशभरात अशा अनेक शाळा आहेत ज्यांना कोणत्याही मंडळाची मान्यता नाही आणि तरीही त्या खोटे बोलून आपल्या शाळा चालवत आहेत आणि त्या शाळांमध्ये हजारो मुले शिकतात.
मुलाच्या प्रवेशापूर्वी शाळेची नोंदणी स्थिती जाणून घ्या :
वास्तविक, जर तुम्ही तुमच्या पाल्याला शाळेत प्रवेश घ्यायचा विचार करत असाल, तर त्याआधी त्या शाळेला कोणत्या बोर्डाने मान्यता दिली आहे याविषय माहिती तपासणे गरजेचे आहे. याशिवाय, शिक्षण विभागाच्या सरकारी पोर्टलवर शाळा नोंदणीकृत आहे की नाही, हेही पाहावे. तुम्ही असे न केल्यास तुम्हाला आणि तुमच्या मुलाला भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, तुमच्या मुलाची अनेक मौल्यवान वर्षे वाया जाऊ शकतात.
टाय-अपच्या आधारे सुरू आहेत शाळा :
देशातील कोणतीही शाळा असो, सीबीएसई, आयसीएसई, राज्य मंडळ किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंडळाने मान्यता मिळणे बंधनकारक आहे. जर शाळा कोणत्याही बोर्डाशी संलग्न नसेल, तर तुम्ही तुमच्या मुलाला त्या शाळेत प्रवेश देता येणार नाही. त्यामुळे, प्रत्यक्षात काय होते की, मान्यता नसणार्या शाळा मंडळाने मान्यता दिलेल्या शाळांशी टाय-अप करतात आणि जेव्हा एखादा विद्यार्थी इयत्ता ९ वीला जातो तेव्हा त्या विद्यार्थ्याची मंडळाकडून नोंदणी त्यांच्या शाळेच्या नावावर केली जाते.
तुम्ही आणि मुले गोत्यात येण्याआधी सावध व्हा :
वरील परिस्थितीनुसार जर विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला, किंवा त्याला कंपार्टमेंट मिळाले, तर प्रत्येक गोष्टीसाठी त्याला ज्या शाळेत त्याची नोंदणी आहे त्या शाळेत जावे लागेल. विद्यार्थ्याने ज्या शाळेत शिक्षण घेतले आहे ती शाळा त्याला या बाबतीत मदत करू शकणार नाही. शेवटी संबंधित विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. याशिवाय ज्या शाळांमध्ये टाय-अपही नाही आणि खोट्याच्या आधारे शाळा चालवल्या जात आहेत, अशा शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचे बोर्ड प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका कुठेही ओळखल्या जात नाहीत आणि अशा परिस्थितीत तुमच्या मुलाचे करिअर धोक्यात येऊ शकते.
त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचा कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी त्या शाळेला कोणत्या बोर्डाने मान्यता दिली आहे हे तपासावे. याशिवाय, कृपया शाळा शिक्षण विभागाच्या सरकारी पोर्टलवर नोंदणीकृत आहे की नाही याविषयी माहिती घ्यावी.