Maharashtra Covid Vaccination: महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एकाच दिवशी १२ लाख लसवंत!

हायलाइट्स:

  • करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राची झेप.
  • एकाच दिवसात दिल्या १२ लाखांपेक्षा अधिक लस मात्रा.
  • लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम.

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज रात्री ८ वाजेपर्यंत १२ लाखांवर नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने नवा विक्रम रचला आहे. सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांना लस देण्यात आली होती. पुढच्या तासाभरात १२ लाखाचा टप्पा पार केला गेला. यामुळे राज्यात लसीकरण मोहिमेत आतापर्यंत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या साडेसहा कोटींच्या जवळ पोहचली आहे. देशभरात उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे. ( Maharashtra Covid Vaccination Updates )

वाचा: राज्यात करोना संकट कायम; बरे होणाऱ्या रुग्णांहून नवीन बाधितांची संख्या जास्त

राज्यात २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांना लस देऊन महाराष्ट्राने आतापर्यंतची सर्वाधिक संख्या नोंदविली होती. आज तो टप्पाही पार करत नवा उच्चांक नोंदवण्यात आरोग्य यंत्रणांना यश आले आहे. आज झालेल्या लसीकरण सत्रांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत ११ लाख ९१ हजार ९२१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यानंतर रात्री ८ वाजताच्या नोंदीनुसार ही संख्या १२ लाख ६ हजार ३२७ इतकी झाली आहे. लसीकरण कार्यक्रमातील हा आजपर्यंतचा विक्रम असून आरोग्य यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे हे फलित आहे, असे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

वाचा: बोईसर स्फोटाचं काळजाचा थरकाप उडवणारं दृष्य; ‘तो’ मृतदेह कुणाचा?

लसींच्या दोन्ही मात्रा देण्यात देशात महाराष्ट्र प्रथम

महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण सव्वासहा कोटींच्या वर लस मात्रा देण्यात आल्या असून त्यात दुसऱ्या लसीची मात्रा देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या आज जारी केलेल्या एकत्रित अहवालानुसार महाराष्ट्रात १ कोटी ७१ लाख जणांना दुसऱ्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

वाचा: करेक्ट कार्यक्रम करण्याचा राजू शेट्टींचा इशारा; शरद पवार म्हणाले…

Source link

maharashtra covid vaccination updatesmaharashtra vaccinationmaharashtra vaccination latest updatemaharashtra vaccination today updatevaccination in maharashtra latest newsकरोना प्रतिबंधात्मक लसीकरणकोविडडॉ. प्रदीप व्यासमहाराष्ट्रलसीकरण
Comments (0)
Add Comment