ठाणे जिल्हा प्रशासनाने नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १९ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
हृदयरोगतज्ज्ञ – ०१ जागा
नेफ्रोलॉजिस्ट – ०१ जागा
स्त्रीरोगतज्ञ – ११ जागा
बालरोगतज्ञ – ११ जागा
सर्जन – ०६ जागा
रेडिओलॉजिस्ट – ०१ जागा
भूलतज्ज्ञ – ११ जागा
फिजिशियन – ०९ जागा
ऑर्थोपेडिक – ०१ जागा
ईएनटी (विशेषज्ञ) – ०१ जागा
नेत्ररोगतज्ज्ञ – ०१ जागा
मानसोपचारतज्ज्ञ – ०२ जागा
वैद्यकीय अधिकारी – ३६ जागा
वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ९३ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार संबधित विषयात एमडी/ एमएस/ एमबीबीएस आदि अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वेतन – (मासिक)
हृदयरोगतज्ज्ञ – १ लाख २५ हजार
नेफ्रोलॉजिस्ट – (ऑन कॉल बेसिस तत्वावर)
स्त्रीरोगतज्ञ – ६० हजार ते ७० हजार
बालरोगतज्ञ – ७५ हजार ते १ लाख
सर्जन – ६० हजार ते ९० हजार
रेडिओलॉजिस्ट – (ऑन कॉल बेसिस तत्वावर)
भूलतज्ज्ञ -७५ हजार ते १ लाख
फिजिशियन – ६० हजार ते ९५ हजार
ऑर्थोपेडिक आणि ईएनटी (विशेषज्ञ) – ६० हजार ते ९० हजार
नेत्ररोगतज्ज्ञ – (ऑन कॉल बेसिस तत्वावर)
मानसोपचारतज्ज्ञ – ७५ हजार
वैद्यकीय अधिकारी – ६० हजार
वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी) – २८ हजार
नोकरी ठिकाण – ठाणे
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘जिल्हा प्रशासन, ठाणे’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १९ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.