Sharad Pawar: करेक्ट कार्यक्रम करण्याचा राजू शेट्टींचा इशारा; शरद पवार म्हणाले…

हायलाइट्स:

  • राजू शेट्टींचे नाव राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतून वगळल्याची चर्चा.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया.
  • अंतिम निर्णय राज्यपालांनी घेतला नसताना अशी विधाने का केली जातात?

पुणे: ‘ राजू शेट्टी यांचे शेती व सहकार क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून घ्यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य सरकारने राज्यपालांना दिला आहे. त्याबाबत राज्यपालांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले असून, आता राज्यपाल काय करतात, याची आम्ही वाट पाहत आहोत,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केले. ( Sharad Pawar On MLC Nomination )

वाचा: ईडीचा असा गैरवापर कधीच झाला नाही!; पवारांनी केला ‘हा’ गंभीर आरोप

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या यादीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव वगळल्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त करताना करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे स्पष्टीकरण दिले. ‘मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांकडे दिली आहे. त्यामध्ये राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून घ्यावे, असा प्रस्ताव दिला आहे. त्याबाबत अंतिम निर्णय राज्यपालांनी घेतलेला नसताना अशा प्रकारची विधाने केली जातात, याचे मला आश्चर्य वाटते. राजू शेट्टींनी काय वक्तव्य करायचे, हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला असून, राज्यपाल काय करतात, याची वाट पाहत आहोत,’ असेही पवार यांनी सांगितले.

वाचा: अनिल देशमुखांच्या जावयासोबत काय घडलं?; राष्ट्रवादीने विचारला गंभीर सवाल

पवार म्हणाले…

– केंद्र सरकारकडून विरोधकांना नमविण्यासाठी ‘ईडी’चा वापर होत आहे. तो केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिणेतील राज्यांतही होत आहे.

– करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. राज्य सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री त्याचे कटाक्षाने पालन करत आहेत. त्यामुळे राज्यातील केंद्र सरकारच्या विचारांच्या लोकांनी तरी किमान तारतम्य बाळगावे.

– शेतकरी गेल्या चौदा महिन्यांपासून घरदार सोडून, थंडी, उन, पाऊस कशाचाही विचार न करता आंदोलन करत आहेत. राज्यकर्ते संवेदनशील असतील, तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची नोंद त्यांनी घ्यायला हवी होती. दुर्दैवाने अन्नदात्याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

वाचा: बोईसर स्फोटाचं काळजाचा थरकाप उडवणारं दृष्य; ‘तो’ मृतदेह कुणाचा?

Source link

maharashtra mlc nominationSharad Pawarsharad pawar latest newssharad pawar on mlc nominationsharad pawar on raju shettiराजू शेट्टीराज्य सरकारराज्यपाल नियुक्त सदस्यराष्ट्रवादीशरद पवार
Comments (0)
Add Comment