कोल्हापूर मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस मधून प्रवास करणारे रोज हजारो प्रवासी असतात. व्यवसाय शिक्षण यासाठी तसेच पर्यटनासाठी हजारो प्रवासी या रेल्वेमधून प्रवास करतात. मात्र, या रेल्वेला लावण्यात आलेले जुने आयसीएफ कोच आता बदलण्यात येणार असून या एक्सप्रेसचे २३ कोच नवीन एलएचबी कोच मध्ये बदलण्यात येणार आहेत. वजनाला हलके आणि जास्त आसन क्षमता तसेच स्वच्छ स्वच्छतागृहे असलेले नवीन एलएचबी कोच लावण्यात येणार असल्याने रेल्वेला आणखी गती मिळणार आहे.
सध्या या गाडीला मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद असल्याने या गाडीचे जुने कोच बदलून नवीन कोच बसवण्यात यावे अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत होती आणि याची दखल घेत रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोच बदलण्याचे आदेश दिले असून यामुळे प्रवाशांचा प्रवास देखील सुखकर होणार आहे.
येत्या २६ जानेवारी पासून हे कोच बदलण्यास सुरुवात करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने कोल्हापूरला येणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांचे जुने कोच बदलण्यात येणार आहेत. तसेच कोल्हापूर मिरज दुहेरीकरण मार्गाचे काम देखील अंतिम टप्प्यात आले असून येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत बहुप्रतिक्षित कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे संघटनांकडून देण्यात आली आहे.या संदर्भात मिरज रेल्वे कृती समितीकडून रेल्वेमंत्री राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्यात आले असून त्यावर दानवे यांनी याबाबत नियोजन सुरू असल्याचे सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News