तुमचं निवेदन घ्यायला नाही, मी कॉफी प्यायला आलोय, चंद्रकांतदादांचं भावी शिक्षकांना उत्तर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : शिक्षक भरतीत मराठी माध्यमाच्या उमेदवारांना डावलून इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना नियुक्ती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा, यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या भावी शिक्षकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडवत, त्यांना गराडा घातला. यावेळी पाटील यांनी ‘मी तुमचे निवेदन घेण्यासाठी आलेलो नाही. तुमच्या खात्याचा मंत्रीही नाही. शिक्षण आयुक्तांची भेट घेण्यासाठी आणि कॉफी पिण्यासाठी आलो आहे’, अशा शब्दांत उमेदवारांशी चर्चा करण्याचे टाळले.

डीटीएड बीएड स्टुडन्ट असोसिएशनच्या वतीने शिक्षक भरतीबाबत शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. पवित्र पोर्टलद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांसह बिगर इंग्रजी शाळेत इंग्रजी माध्यमाच्या पदविका शिक्षकांना नियुक्त करण्याचा निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी राज्यातील उमेदवारांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असतांना, मंत्री चंद्रकांत पाटील हे शिक्षण आयुक्त चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी आक्रमक झालेल्या उमेदवारांनी पाटील यांचा ताफा अडवत, शिक्षक भरतीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

मंत्री पाटील यांनी निवेदन स्वीकारून उमेदवारांचे म्हणणे ऐकून घ्यावे; तसेच त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी मागणी महिला उमेदवारांनी केली. त्यावेळी पाटील म्हणाले की, मी तुमचे म्हणणे ऐकण्यासाठी आलेलो नाही, असे सांगत बोलण्याचे टाळल्याचे असोसिएशनच्या संतोष मगर यांनी सांगितले. गोंधळ वाढल्यानंतर शिक्षण आयुक्त सुरज मांढरे हे स्वत: पाटील यांना कार्यालयात घेऊन जाण्यासाठी खाली आले. उमेदवारांचा वाढती आक्रमकता पाहून पाटील हे पोलिसांच्या गरड्यात शिक्षण आयुक्त कार्यालयात गेले. मात्र, त्यानंतरही उमेदवारांनी आपले आंदोलन सुरू ठेवले.

मंत्री चंद्रकांत पाटील हे शिक्षण आयुक्त कार्यालयात आल्यानंतर, त्यांना शिक्षक भरतीतील पात्र उमेदवारांनी गराडा घालत मागण्यांचे निवेदन स्वीकारण्याचे विनंती केली. ‘मी शिक्षण आयुक्तांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आणि कॉफी पिण्यासाठी आलो आहे. तुमचे निवेदन स्वीकारण्यासाठी नाही. तुमच्या खात्याचा मंत्री नाही. शिक्षक भरतीचा निर्णय मला माहिती आहे’, असे सांगत आमच्याशी चर्चा करण्यासाठी टाळले – संतोष मगर, डीटीएड बीएड स्टुडन्ट असोसिएशन

Source link

chandrakant patilmemorendum of future teacherMinister Chandrakant PatilTeacher Recruitmentचंद्रकांत पाटीलमंत्री चंद्रकांत पाटील ॉशिक्षक भरती
Comments (0)
Add Comment