नायलॉन मांजा दाखवा अन् ५००० रुपये मिळवा, विक्री थांबवण्यासाठी मनपाची अनोखी युक्ती

प्रियंका शेळके पाटील
अहमदनगर: नवीन वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांतीच्या सणाकडे पाहिले जाते. मकर संक्रांतीचा सण जसा गोड आहे. पण नायलॉन मांजामुळे त्या सणाला गालबोट देखील लागत आहे. संक्रांतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात बालगोपाळ हे पतंग उडवत असतात. हे पतंग उडवताना बऱ्याचदा नायलॉन मांजाला पसंती दिली जाते.
जामिनानंतर समर्थकांचा जल्लोष महागात; सुनील केदार यांच्या अडचणीत वाढ, विविध कलमांखाली गुन्हा दाखल
मात्र नायलॉन मांजा हा इतका घातक आहे की, त्यामुळे पशु प्राण्यांचा तर जीव जातोच मात्र मनुष्याला देखील या नायलॉन मांजामुळे मोठी हानी होते. त्यामुळे या मांजाच्या खरेदी विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. मात्र असं असताना देखील बऱ्याचदा छुप्या पद्धतीने नायलॉन मांजा विकला जातो. यालाच अटकाव करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या प्रशासन राबवत असतात. अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने देखील नायलॉन मांजाची माहिती द्या आणि पाच हजार रुपये बक्षीस मिळवा असा आव्हान करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने कारवाई देखील सध्या होत आहे.

शासनाने वापरास प्रतिबंध केलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांवर महापालिका कठोर कारवाई करणार असून अशा विक्रेत्यांची गोपनीय माहिती देणाऱ्यास महापालिका पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी दिली. नायलॉन मांजामुळे मनुष्य आणि पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे नायलॉन मांजावर शासनाने प्रतिबंध घातले आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेत बैठक घेऊन आयुक्त डॉ. जावळे अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या.

२८८ कोटी खर्चून दिंडी मार्ग केला, निकृष्ट कामामुळे रस्त्यावरील भेगा ठरतायत मृत्यूचा सापळा

आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी. दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही गय केली जाणार नाही. महापालिकेला प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती ७५८८१६८६७२ या मोबाईल क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. त्याचबरोबर नागरिकांनी देखील जीवितास धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाचा वापर स्वतःहून टाळावा, असे आवाहन डॉ. जावळे यांनी केले आहे.

Source link

Ahmednagar Municipal Corporationahmednagar municipal corporation newsahmednagar newsnylon manja sales newsnylon mats newsअहमदनगर बातमीनायलॉन मांजा बातमीनायलॉन मांजा विक्री बातमी
Comments (0)
Add Comment