नरेंद्र मोदींच्या स्वागताला होत्या.
राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी हेलिकॉप्टरने निलीगिरी बाग हेलिपॅडकडे रवाना झाले. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (नाशिक शहर) संदीप कर्णिक उपस्थित होते. यानंतर नरेंद्र मोदी हे रोड शो आणि राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी तपोवन मैदानाकडे रवाना झाले.
मोदींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळ्या, तसेच रंगरंगोटी करण्यात आली असून, प्रभू श्रीरामाची नगरी पूर्णपणे भगवी करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणाही नाशिकला सजवण्यासाठी राबत आहे. मोदी रोड शो, काळाराम मंदिराचे दर्शन, गोदाकाठाची पाहणी करणार असून, सभेलाही संबोधित करणार आहेत.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News