raut gives challenge to patil: शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण द्या, राजकारण सोडेन- संजय राऊत यांचे आव्हान

हायलाइट्स:

  • शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकात पाटील यांना दिले आव्हान.
  • शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडेन- संजय राऊत.
  • चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आलेले सहन होत नाही- संजय राऊत.

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या खंजीर खुपसण्याबाबतच्या वक्तव्यावरून सध्या शिवसेना आणि विरोधी पक्षांतील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. आता शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पाटील यांना आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो, असे थेट आव्हानच राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. (shiv sena mp sanjay raut gives challenge to bjp state president chandrakant patil)

खासदार राऊत हे आज पुण्यातील आज शिरुर-हवेली येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. त्यावेळी त्यानी थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. राऊत म्हणाले की, चंद्रकांतदादा हरिश्चंद्राचे अवतार आहेत. आम्ही एकत्र काम केले आहे. मी तर नेहमीच आव्हान देत आलो आहे की शरद पवार यांनी पाठीत खंजीर खूपसल्याचे एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडतो. ही मराठ्यांची औलाद आहे. आम्ही समोरून वार करतो, छत्रपती शिवाजी महाराज यांना अफझल खानाचा समोरून कोथळा काढला होता, असा टोलाही त्यांनी पाटील यांना लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा- किरीट सोमय्यांचे मुख्यमंत्र्यांना ‘हे’ खुले आव्हान; म्हणाले, ‘हिम्मत असेल तर…’

आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. आम्ही पाठीमागून वार करत नाही. समोरून कोथळा काढतो, असे मी म्हटले होते तर याचा त्यांना एवढा त्रास झाला की त्यांनी थेट गुन्हेच दाखल करायला सांगितले. समोरून वार केल्यावर काय निघणार? कोथळाच निघणार ना, असेही राऊत यांनी पुढे म्हटले.

क्लिक करा आणि वाचा- नारायण राणेंच्या टीकेनंतर आता नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार आलेले सहन होत नाही. पण, जेवढे तुम्ही तडफडत राहाल तेवढी तुमची शक्ती क्षीण होईल. यावेळी त्यांनी आघाडीच्या नेत्यांनाही कानपिचक्या दिल्या. आघाडीच्या नेत्यांनीही विरोधकासारखे वागू नये. मी आज वरीष्ठांशी बोलेन. ऐकले तर पाहू नाहीतर शिवसेनेच्या भाषेत त्यांना सांगू, असेही राऊत म्हमाले. कोण आला रे कोण आला, ही घोषणा भाजपात दिलेली पाहिली आहे का कधी?, ती फक्त शिवसेनेत ऐकायला मिळते, असा टोलाही राऊत यांनी पाटील यांना लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा- संजय राऊत यांना सगळं कळतं, ते जगाचे नेते आहेत; चंद्रकांत पाटील यांचा टोला

Source link

chandrakant patilRaut gives challenge to chandrakant patilSanjay RautSharad Pawarचंद्रकांत पाटीलशरद पवारसंजय राऊत
Comments (0)
Add Comment