पुणे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात भरती, थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड

BAVMC Pune Recruitment 2024: पुणे महानगरपालिके अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे पालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी विविध पदे भरली जाणार आहेत. यामध्ये प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या पदांचा समावेश आहे.

नुकतीच याबाबत पालिकेने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये एकूण १८ रिक्त जागा भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. ही मुलाखत प्रक्रिया १६ आणि २३ जानेवारी रोजी पदनिहाय होणार आहे. तेव्हा या भरती मधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
प्रोफेसर – ०७ जागा
असोसिएट प्रोफेसर – ११ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १८ जागा


शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयात एमडी, एमएस, डीएनबी असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतन –
प्रोफेसर – १ लाख ८५ हजार
असोसिएट प्रोफेसर – १ लाख ७० हजार

नोकरी ठिकाण – पुणे

वयोमर्यादा –
प्रोफेसर – खुल्या प्रवर्गासाठी ५० वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५५ वर्ष
असोसिएट प्रोफेसर – खुल्या प्रवर्गासाठी ४५ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ५० वर्ष

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे

मुलाखतीचा पत्ता – पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे

मुलाखतीची तारीख –
प्रोफेसर – २३ जानेवारी २०२४
असोसिएट प्रोफेसर – १६ जानेवारी २०२४

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

atalbihari vajpayee hospital pune jobsBAVMC Pune Bharti 2024BAVMC Pune Recruitment 2024pune municipal hospital bhartirecruitmentअटल बिहारी वाजपेयी रुग्णालयात भरतीपुणे महापालिकेत भरती
Comments (0)
Add Comment