यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ०५ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता वेतन आणि अर्ज प्रक्रिया यांचे सविस्तर तपशील जाणून घेऊया.
‘नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
असिस्टंट फोरमन – १५० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १५० जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार इलेक्ट्रोनिक, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वयोमर्यादा – किमान १८ ते कमाल ३० वर्षे. यामध्ये राखीव प्रवर्गाला सवलत देण्यात आली आहे.
वेतन – ४७ हजार ३३० रुपये (मासिक)
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ फेब्रुवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड भरती’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ०५ फेब्रुवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.