हायलाइट्स:
- पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.
- तीन हजारावर कार्यकर्ते जलसमाधी घेण्यासाठी नृसिंहवाडीच्या दिशेने रवाना.
- काही कार्यकर्त्यांनी थेट पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमात उडी मारल्याने वाडीत तणाव.
म टा प्रतिनिधी, कोल्हापूर
पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून तीन हजारावर कार्यकर्ते जलसमाधी घेण्यासाठी नृसिंहवाडीच्या दिशेने रवाना होत आहेत. काही कार्यकर्त्यांनी थेट पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमात उडी मारल्याने वाडीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. (jal samadhi andolan swabhimani shetkari sanghatana activist jumped into the river)
पाच दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रयाग चिखली येथून पंचगंगा परिक्रमा यात्रा काढली. दुपारनंतर यात्रा कुरूंदवाड येथून वाडी च्या दिशेने निघाली आहे. कुरुंदवाडच्या पुलावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हजारावर पोलीस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी सज्ज आहेत. पण कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्यामुळे तेथे तणावपूर्ण वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. झटापट झाल्यास गोंधळ उडण्याचीही चिन्हे आहेत. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; मुख्यमंत्र्यांचे रुग्णालयांना ‘हे’ कळकळीचे आवाहन
सायंकाळी पाचनंतर जाहीर सभा होऊन थेट जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्राकडे एकही कार्यकर्ता जाऊ नये यासाठी नदीच्या दोन्ही बाजूला मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा बंदोबस्त चुकवत काही कार्यकर्त्यांनी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नदीत उडी मारली. त्यांना यांत्रिक बोटींच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. आंदोलक मोठ्या प्रमाणात नदीकाठावर आल्यास गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुरुंदवाड पुलावरच सर्वांना अडवण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण द्या, राजकारण सोडेन- संजय राऊत यांचे आव्हान
पाच दिवसानंतर प्रशासनाने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाची दखल घेतल्याचे समजते. पूरग्रस्तांच्या मागणीसाठी सोमवारी मुंबईत बैठक बोलविण्यात आली असून या बैठकीत मदतीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. हा निरोप माजी खासदार राजू शेट्टी यांना पोहोचल्यानंतर सायंकाळी ते आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
क्लिक करा आणि वाचा- महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी ‘त्या’ क्षणाबद्दल सांगितले, म्हणाले…