लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम, हार्बर मार्गावर ब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान अप-डाउन मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण पाचव्या-सहाव्या मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असल्याने रविवारी दिवसा मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक – सांताक्रुझ ते गोरेगाव

मार्ग – अप आणि डाउन जलद

वेळ – सकाळी १० ते सायंकाळी ५

परिणाम – ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, अजिंक्य रहाणेला संधी मिळाली का पाहा…
हार्बर रेल्वे

स्थानक – वडाळा रोड ते मानखुर्द

मार्ग – अप आणि डाउन

वेळ – सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत

परिणाम – ब्लॉकमुळे वडाळा रोड ते मानखुर्द, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/बेलापूर/पनवेल अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते गोरेगाव लोकल वेळापत्रकानूसार धावतील. पनवेल ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे

स्थानक – ठाणे ते कल्याण

मार्ग – पाचवी आणि सहावी मार्गिका

वेळ – शनिवारी रात्री ११.४० ते रविवारी पहाटे ३.४०

परिणाम – ब्लॉकमुळे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील मेल-एक्स्प्रेस जलद अप-डाउन मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यामुळे मेल-एक्स्प्रेस १५-२० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. रात्रकालीन ब्लॉकमुळे सीएसएमटी ते कल्याणदरम्यान रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

मराठी पाट्या लावण्यास दुकानदारांची टाळाटाळ, BMC करणार अडीच हजार दुकानांवर कारवाई

Source link

Mumbai localmumbai local megablockmumbai marathi newswest-harbour local megablock timetableपश्चिम-हार्बर लोकल मेगाब्लॉक वेळापत्रकमुंबई मराठी बातम्यामुंबई लोकलमुंबई लोकल मेगाब्लॉक
Comments (0)
Add Comment