पुणे-लोणावळा लोकल सुरु, प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; अशी आहे लोकलची वेळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे : करोनानंतर दुपारच्या टप्प्यात पुणे ते लोणावळा दरम्यान बंद असलेली लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्या फायदा होणार आहे. शिवाजीनगर येथून दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी लोकल सोडण्यात येणार आहे.

करोनाच्या काळात रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यावेळी पुणे-लोणावळा लोकल सेवा बंद करण्यात आली होती. करोनाचे सावट संपल्यानंतर लोकल सेवा सुरू केली होती. पण, दुपारच्या टप्प्यातील लोकल सेवा बंद होती. त्यामुळे विद्यार्थी व कामाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांचे हाल होत होते.

एका व्यक्तीसाठी देवासोबत खेळ, रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावरुन काँग्रेसची मोदींवर टीका
रेल्वे प्रशासनाकडून दुपारच्या टप्प्यात देखभाल दुरुस्तीची कामे केली जात असल्यामुळे लोकल सेवा सुरू करण्यास नकार दिला जात होता. पण, नागरिकांकडून अनेक वेळा दुपारची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आंदोलन करण्यात आली होती. काही वेळा रेल्वे अडविण्याच्या घटना घडल्या होत्या. शुक्रवारी सकाळी याच मागणीसाठी लोणावळा येथे ‘डेक्कन क्वीन’ अडविण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने दुपारच्या टप्प्यात शिवाजीनगर येथून एक व लोणावळा येथून एक अशी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

दुपारच्या लोकलच्या वेळा

– शिवाजीनगरहून १२ वाजून पाच मिनिटांनी लोकल सुटेल. ती १२ वाजून ४५ मिनिटांनी लोणावळा येथे पोहोचेल.

– लोणावळा येथून सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी लोकल सुटेल. ती शिवाजीनगर येथे एक वाजून २० मिनिटांनी दाखल होईल.

मी नाकारलेला मुख्यमंत्री नाही, आजही मध्य प्रदेशात…; शिवराजसिंह चौहान यांचे सूचक वक्तव्य

Source link

lonavala local time tablepune local railwaypune marathi newspune-lonavla localपुणे मराठी बातम्यापुणे लोकल रेल्वेपुणे-लोणावळा लोकललोणावळा लोकल वेळापत्रक
Comments (0)
Add Comment